आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पाठपुराव्याचे सकारात्मक परिणाम, अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर :-आमदार आशुतोष काळे.

 पाठपुराव्याचे सकारात्मक परिणाम, अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर :-आमदार आशुतोष काळे.

 

            


     

 

कोपरगाव प्रतिनिधी:------ लोकप्रतिनिधी हा जनता व सरकारमधील दुवा असतो. त्या माध्यमातून जनतेच्या सेवकाची भूमिका पार पाडतांना मतदार संघातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याचे सकारात्मक परिणाम मिळत असून मतदार संघातील अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
                कोपरगाव तालुक्यातील वारी येथे सन २०२०-२१ जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत २१.७३ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या वारी ते कान्हेगाव रस्त्याचे व आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत ३ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कान्हेगाव चौकी ते सात आंबेगाव वस्ती रस्ता मुरुमीकरण कामाचे भूमिपूजन आणि जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० अंतर्गत ८.५० लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या आंगणवाडी इमारतीचे उदघाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कान्हेगाव-वारी ग्रामस्थांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला.        

        चौकट :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावात रस्त्यांची अवस्था पाहता या गावात रस्ते आहेत का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणींची दखल घेवून कान्हेगाव-वारी परिसरातील रस्त्यांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी देवून या रस्त्यांचे प्रश्न कोरोनाच्या संकटात देखील मार्गी लावले. जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे आमदार आशुतोष काळे आदर्श उदाहरण असून त्यांच्या रूपाने तालुक्याला काम करणारा लोकप्रतिनिधी लाभला आहे.

   - पंचायत समिती सदस्य मधुकर टेके.      

                     याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधनेउपसभापती अर्जुनराव काळेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोमजिल्हा परिषद सदस्या सौ. सोनालीताई साबळेपंचायत समिती सदस्य मधुकर टेकेजिनिंग व प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदारराष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगरविजय गायकवाडकृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधवमाजी सरपंच रावसाहेब टेकेसुमित टेकेसंजय जाधव,प्रतीक होवाळेलक्ष्मण चौधरीबनकटराव जगताप,देवचंद कडेकरदिनकर काजळेबबन सांगळे,जनार्दन जगतापअनिल काजळेदीपक भाकरे,सचिन मेहेरेनामदेव जाधवदत्तात्रय शिरसाठ,भास्कर आदमानेवाल्मिक जाधवनवनाथ जाधव,बाबासाहेब शिंदेराजेंद्र पांडेनानासाहेब टेकेरमेश कोकाटेप्रवीण खैरनारपंडित चव्हाणराजेंद्र गायकवाड आदींसह वारी व कान्हेगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments