महाविकास आघाडी सरकारच्या सहकार्याने नागरिकांना अपेक्षित असलेली विकासकामे पूर्ण करू - आमदार आशुतोष काळे
![]() |
कोपरगांव प्रतिनिधी:--- विधानसभा मतदार संघातील जनतेने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या सर्वच खात्यांचे सहकार्य मिळत आहे. मिळालेल्या सहकार्यातून मतदार संघाच्या विकासाला देण्यात यशस्वी होत असून जनतेचा प्रतिनिधी या नात्याने महाविकास आघाडी सरकारच्या सहकार्याने नागरिकांना अपेक्षित असलेली विकासकामे पूर्ण करू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत १६ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या मायगाव देवी ते धामोरी रस्ता खडीकरण,तांबोळीनाला दुरुस्ती व मुरुमीकरण आणि मायगाव देवी ते झेड कॉर्नर रस्ता मुरुमीकरण कामाचे तसेच मायगाव देवी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे भूमीपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, मतदार संघाच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक विकासकामांचे प्रस्ताव शासनदरबारी सादर केले. त्यापैकी अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळाल्या काही प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. ते प्रस्ताव देखील मंजूर होतील. मंजूर प्रस्तावातून रस्त्यांची कामे मार्गी लागून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत काही रस्त्यांची देखील लवकरच कामे सुरु होतील. कोरोना संकटामुळे आर्थिक अडचण आहे मात्र मतदार संघाच्या विकासासाठी जेथून निधी उपलब्ध होईल तेथून निधी मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहे. मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी आणून मतदार संघाचा विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक ज्ञानदेव मांजरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, पंचायत समिती सदस्य अनिल कदम,श्रीकृष्ण गाडे, प्रभाकर गाडे, साहेबराव गाडे,अनंतराव गाडे, धोंडीराम गाडे, नामदेव साबळे,बाबासाहेब गाडे, गिरीश गाडे, मोतीराम मोकळ,पुंडलिक माळी, भगवान माळी, चैतन्य कुलकर्णी,राहुल जगधने, भारतशेठ भुसारे, बापू गाडे, अशोक भगत, बापू जाधव, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments