आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

विद्यार्थिनींनी माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यक्तिमत्व विकास साधावा - आमदार आशुतोष काळे.

 विद्यार्थिनींनी माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यक्तिमत्व विकास साधावा - आमदार आशुतोष काळे.



कोपरगाव प्रतिनिधी:-----  जागतिकरणाचे युग आणि तंत्रज्ञान हे समीकरण बनत चालले असून येणारा काळ हा प्रगत तंत्रज्ञानाचा काळ असणार आहे. आज प्रत्येक क्षेत्राचा होत असलेल्या विकासात तंत्रज्ञानाची आतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे यापुढील काळात शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड अत्यंत आवश्यक असून विद्यार्थिनींनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यक्तिमत्व विकास साधावा असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आय. डी. एफ. सी. फर्स्ट भारत लिमिटेड यांच्यावतीने डिजिटल बोर्ड भेट देण्यात आला. महाविद्यालय माहिती तंत्रज्ञान समिती अंतर्गत या डिजिटल क्लास रूमचे उदघाटन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. 

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कीआज जगभर सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचे वारे वाहत आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला देखील या प्रगत तंत्रज्ञानाशी जोडून घ्यावे लागणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षणक्षेत्राचा विकास साधायचा असेल तर तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रणालीत समावेश करावाच लागेल. त्यासाठी वेळीच काळाची पावले ओळखून माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून महाविद्यालयातील विद्यार्थिनींनीचा शैक्षणिक हित जोपासण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

याप्रसंगी आयडीएफसी फर्स्ट भारत लिमिटेडच्या वतीने जॉन कॉल अशोकअसिस्टंट जनरल मॅनेजर सी. एस. आर. विभाग शरद देडे,मॅनेजर सी. एस. आर. विभाग ज्ञानेश्वर दातीरसतीश वैद्य यांनी आपल्या मनोगतातून आयडीएफसी फर्स्ट भारत लिमिटेडच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच महिलांसाठी खास उपक्रमात महिला महाविद्यालयाचे योगदान असावे असे मनोगतातून स्पष्ट केले विद्यार्थिनींच्या विकासासाठी अनेक स्पर्धा माहिती तंत्रज्ञानाचे युग व विद्यार्थिनींचा विकास यासाठी आय.डी.एफ.सी. फर्स्ट भारत लिमिटेडचे विविध उपक्रम विविध कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी रयत शिक्षण संस्था व राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची ओळख उपस्थित मान्यवरांना करून दिली. तसेच  महाविद्यालयांची माहिती तंत्रज्ञान समितीचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास या विषयी सविस्तर माहिती आपल्या मनोगतातून सांगितली. या उद्घाटन कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. रामदास बर्वे,कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. सतीश शिर्केसर्व विभाग प्रमुख व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगिता रांधवणे.

Post a Comment

0 Comments