औद्योगिक वसाहती च्या माध्यमातून उत्पादने देशभरात पोहोचते ही अभिमानाची बाब:-- विवेक कोल्हे.
![]() |
![]() |
कोपरगांव प्रतिनिधी:------ कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादीत झालेले उत्पादन देशभरात पोहचविण्याचे काम वसाहतीच्या माध्यमातुन होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असुन उद्योजकांना पायाभुत सुविधा चांगल्या प्रकारे पुरविण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. हवाई, रस्ते आणि रेल्वे मार्गाची सुविधा आपल्याला सहज उपलब्ध असल्याने उदयोजकांनी या गोष्टींचा फायदा घ्यावा, असे प्रतिपादन कोपरगाव औद्योगिक
याप्रसंगी औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक मनीष गोकुळचंद कोठारी यांचा कोठारी फूड प्राॅडक्ट या उद्योगाला आदर्श उद्योजक तर व्हीजन इन्सुलेशन प्राॅडक्टचे उद्योजक देवीप्रसाद श्रीकांत मिश्रा यांना नवउद्योजक पुरस्कार आद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या हस्ते देवुन सन्मान करण्यात आला.
सहकारी वसाहतीचे चेअरमन विवेकभैया बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहत इस्टेट सोसायटी कोपरगांव या संस्थेची ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २६ मार्च २०२१ रोजी आॕनलाईन पार पडली. या सभेप्रसंगी अध्यक्षपदावरून विवेक कोल्हे बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, औदयोगिक वसाहतीमधील उदयोजकांना उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतांना भावी काळात मल्टीपरपज सभागृह, रस्त्यांचे डांबरीकरण, वाॅटर टॅंक, वीजेचे प्रश्न सुरळीत करणे, ड्रेनेज आदी गोष्टी पुर्ण केल्या जात आहे. संजीवानी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री. बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नाने नवीन मंजूर वाढीव जमीन मिळण्यासाठीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असुन सुमारे १४ हेक्टर जमीनीचा ताबाही लवकरच मिळणार आहे.
याप्रसंगी अहवाल सालात कोरोना कालावधीत दिवंगत झालेले, शहिद जवान, अज्ञात, मुत्सदी शास्त्रज्ञ, समाजसेवक, संशोधक, थोर साहित्यीक, लेखक, क्रिडापटु इतर क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते, संस्थेचे सभासद, संस्थेचे हितचिंतक यांना श्रध्दांजली वाहुन सभेला सुरु करण्यात आली. सदर सभेतील सर्व विषयांना एकमताने मंजुरी सभासदांनी दिली.
संस्थेचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे, व्हा. चेअरमन मुनिष माणिकचंद ठोळे, संचालक मनोज कांतीलाल अग्रवाल, अनिल भगतसिंग सोनवणे, केशवराव छगनराव भवर, पराग शिवाजीराव संधान, रविंद्र पंढरीनाथ नरोडे, पंडीत जमनराव भारुड, चंद्रशेखर छबुराव आव्हाड, सुकृत राजेंद्र शिंदे, रविंद्र चंद्रकांत आढाव, ऐश्वर्यलक्ष्मी संजय सातभाई, शिमला जितेंद्रसिंग सारदा, रोहित दिलीपराव वाघ, प्रशांत भास्कराव होन, सोमनाथ रुंजबा निरगुडे, सहाय्यक निबंधक कोपरगांव यांच्यासह आयोजित केलेल्या वार्षीक सर्वसाधारण आॕनलाईन सभेत सभासद उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन संचालक पंडीत भारुड, मॅनेजर एस.डी. लोखंडे यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक केशवराव भवर यांनी केले.
0 Comments