आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पंचाय समितीविस्तारीकरण ७० लक्ष व शुवैद्यकीय चिकित्सालयासाठी २२ लक्ष निधी उपलब्ध :- आमदार आशुतोष काळे.

   पंचाय समितीविस्तारीकरण ७० लक्ष व शुवैद्यकीय चिकित्सालयासाठी २२ लक्ष निधी उपलब्ध :- आमदार आशुतोष काळे.

 


कोपरगाव प्रतिनिधी :- महाविकास आघाडी सरकारने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतींच्या बांधकामासाठी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत कोपरगाव पंचायत समितीच्या विस्तारीकरण बांधकामासाठी ७०.०० लक्ष रुपये तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत पशुवैद्यकीय चिकित्सालयासाठी २२ लक्ष असा एकूण ९२ लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास कारण्यासाठी तसेच नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पंचायत समितीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.  त्यासाठी पंचायत समिती प्रशासकीय कार्यालय सुस्थितीत असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पंचायत समिती कार्यालयात आल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव पंचायत समितीचे विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. पंचायत समितीचे विस्तारीकरणासाठी जास्तीत जास्त निधी आणून अद्यावत सुविधांनी युक्त पंचायत समिती कार्यालय साकारले जाणार आहे. या विस्तारीकरणाच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही याची दक्षता घेवून आमदार आशुतोष काळे निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महाविकास आघाडी सरकारच्या ग्रामविकास विभागाने कोपरगाव पंचायत समितीला ७०.०० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. मागील वर्षी आलेल्या जागतिक कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेचे गणित बिघडले होते. त्यामुळे विकासकामांसाठी निधी मिळण्यात अडचणी येत असतांना निधी उपलब्ध झाला हि अतिशय समाधानाची बाब आहे. तसेच पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या इमारतीसाठी देखील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत २२ लक्ष रुपये निधी मिळाला आहे. मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक विकासकामांचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल केले असून त्या प्रस्तावांना देखील लवकरात लवकर मंजुरी मिळवून निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments