ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबाला पत्रकार संघ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला मदतीचा हात.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----- शहरातील स्टेशन रोड बागुल वस्ती याठिकाणी रस्त्याच्या कडेला राहत असलेल्या ऊस तोडणी कामगार इब्राहिम पठाण यांच्या घराला महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारच्या सुमारास आग लागल्याने सर्व संसारोपयोगी वस्तू जाळून खाक झाल्या त्यांच्या दोनवेळच्या अन्नपण्याची देखील मोठी गंभीर समस्या निर्माण झाली पठाण कुटुंबीय हे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून ते वीस ते पंचवीस वर्षांपासून कोपरगाव येथे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आले ऊस तोडणी करून हे कुटुंब आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होते मात्र या घटनेने अचानक त्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली अशा परिस्थिती या कुटुंबाला आधाराची गरज होती ही गरज ओळखून शुक्रवार दिनांक १९ मार्च २०२१ रोजी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या पठाण कुटुंबाला किमान एक ते दीड महिना भर पुरेल असा किराणा सामान ,गहू,तांदूळ कपडे व रोख रक्कम तर काहींनी त्यांच्या निवाऱ्याला पत्रे अश्या स्वरूपाची मदत देऊन माणुसकी अजून जिवंत आहे हे दाखवून देत मदतीचा हात दिला आहे यामध्ये
कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्यध्यक्ष युसूफ रंगरेज,रोहित टेके,मोबिन खान,अनिल दिक्षित सामाजिक कार्यकर्ते सतिश गुजराथी,डॉ सी एम मेहता कन्या विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका मंजुषा सुरवसे दादा भारूड अरुण कदम ,प्रविण निळकंठ, अशोक लकारे, शंकर वाणी, कैलास साळवे, भीमा संवत्सरकर यांनी भरीव मदत देऊन सहकार्य केले.
0 Comments