आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

खोट्या वल्गना करून शेतकऱ्यांना नादी लावू नका. --- केशवराव होन

खोट्या वल्गना  करून शेतकऱ्यांना नादी लावू नका.
--- केशवराव होन
कोपरगाव प्रतिनिधी:------ 
समृध्दी महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना तत्कालीन सरकारने थेट जमीन खरेदीच्या पर्यायात रेडीरेकनरच्या पाच पट रक्कम मोबदला देवून समृद्धी नेच शेतक-यांना समृध्द केले. जमिनी अधिग्रहण चा कायदा झाल्यामुळे आता बुलेट ट्रेन साठी जमिनी अधिग्रहित केल्यास त्या शेतकऱ्यांना सुद्धा भरपूर मोबदला मिळेल. समृद्धीचा मोबदला माझ्यामुळेच मिळाला आणि आता बुलेट ट्रेन साठी सुद्धा  मीच जादा मोबदला मिळवून देईन अशा  खोट्या वल्गना करून कोणी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, अशी टीका चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी केली.

समृद्धी महामार्गाचे काम आणखी लांबणीवर पडू नये यासाठी उर्वरित जमीन भूसंपादन कायद्याने संपादित करण्याची परवानगी रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे मागितली आहे. थेट खरेदीऐवजी भूसंपादन कायद्याद्वारे जमिनी दिल्यास मोबदला कमी मिळेल, या धास्तीने शेतकरी आता जमिनी देण्याची तयारी दाखवू लागले आहेत.

सद्य:स्थितीत थेट खरेदीने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाच पट मोबदला दिला जातो आहे. याशिवाय झाडे, पिके, विहिरी, बांधकाम यांचे मूल्यांकन करून त्याची वेगळी रक्कमदेखील संबंधित मालकांना दिली जात आहे. भरघोस मोबदला मिळत असल्याने कोपरगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत. आता तर जमिनी अधिग्रहण करण्यासाठी देणाऱ्या मोबदल्याचा कायदाच झाला आहे. तेंव्हा आता , बुलेट ट्रेन धावणार, म्हणजे जमिनी अधिग्रहण होणारच म्हंटल्यावर समृध्दी प्रमाणे अधिक मोबदला मिळेलच ना, आपण जास्तीचा मोबदला मिळवून देऊ अशा वल्गना करून मग उगाच शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे तालुक्याचे आमदार दाखवत आहेत. परंतु समृद्धी महामार्ग असो की बुलेट ट्रेन जमिनी अधिग्रहण करण्याच्या जादा भाव देण्याचे   शेतकऱ्यावर आमदारांना आलेले प्रेम  हे पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यांना जर या शेतकऱ्यांचे खरे प्रेम असते तर त्यांनी या परिसरात होणारी स्मार्ट सिटी घालविली नसती,  कारण स्मार्ट सिटी मध्ये  जमिनी अधिग्रहण होण्याबरोबर पुढच्या पिढ्यांसाठी उद्योगांची मोठी निर्मिती होणार होती त्यामुळे परिसरा बरोबर तालुक्याचा ही मोठा विकास झाला असता परंतु केवळ विरोधात असल्याच्या कारणास्तव शेतकऱ्यांच्या व तालुक्याच्या विकासाबरोबर पाच पिढ्यांचे आर्थिक उन्नतीचे नुकसान  करण्याचे पाप केले कारण स्मार्ट सिटी झाली असती तर  उद्योग व्यवसाय वाढले असते आपली मुले आपल्याच तालुक्यात मोठमोठाल्या पदावर नोकरीला राहिली असती बाजारपेठ फुलली असती  पाण्याचे स्रोत वाढले असते. ही दूरदृष्टी ज्यांना नाही ते काय शेतकऱ्यांचे व तालुक्याचे भले करणार  असा सवाल  श्री होन यांनी उपस्थित केला  ते तर केवळ  शेतकऱ्यांना नादी लावून आपली पाठ थोपटून घेण्यातच धन्यता मानत आहे.

Post a Comment

0 Comments