Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

करोना लस नोंदणीसाठी संजीवनी ई बस गावोगावी. युवा नेते श्री सुमित कोल्हे यांचा अभिनव उपक्रम.

 करोना लस नोंदणीसाठी संजीवनी ई बस गावोगावी.

    युवा नेते श्री सुमित कोल्हे यांचा अभिनव उपक्रम.कोपरगांव प्रतिनिधी:------ कोरोनाच्या वैश्विक  महामारी संकटाने संपुर्ण जगाला तब्बल वर्षभर  वेठीस धरले. कोणावर काय संकटे आली हे सर्वश्रुत आहे. आता करोना लस बाजारात आल्याने थोडास धिर सर्वांनाच मिळाला आहे. परंतु खेडोपाडीच्या वृध्द व्यक्तींना तसेच इतरही ज्यांना इतर आजारांनी ग्रासले आहे, अशांपर्यंत  ही लस कधी पोहचणार, कारण लसीकरणासाठी ऑनलाईन  नोंदणी आवश्यक  आहे. खेडोपाडीच्या लोकांकडे त्यासाठी अँड्रॉइड  फोन असेलच असे नाही. हे सर्व प्रश्न  डोळ्यासमोर  ठेवुन घरातील सर्व कोल्हे कुटूंबियांच्या मार्गदर्शनाखाली  युवा नेते व संजीवनी फाऊंडेशनचे सचिव श्री सुमित कोल्हे यांनी संजीवनी फाऊंडेशनची ई बस खेडोपाडी पाठवुन अशा  व्यक्तींची कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी अभियान दि. १३ मार्च पासुन सुरू केले आहे. 
या उपक्रमाची सुरूवात ब्राम्हणगांव येथुन झाली असुन पहिल्याच दिवशी १५० व्यक्तींची नाव नोंदणी झाली आहे. ही लस विनामुल्य देण्यात येणार असुन नोंदणीकृत व्यक्तींना लसी करणासाठी कोठे व कधी जायचे, याचेही मार्गदर्शन  करण्यात येणार आहे. 
संजीवनी  फाऊंडेशनद्वारे कोविड १९ च्या संवेदनशिल  सुरूवातीच्या काळात अन्नदान, स्थलांतरीत कामगारांसाठी  प्रवासची सोय, औषधे, किराणा, भाजीपाला, अर्सेनिक अल्बम गोळ्या , इत्यादींचे वाटप, रोजगार मेळावा, पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण , असे अनेक उपक्रम राबवुन शक्य तितक्या गरजुंना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु कोरोनाचा कहर पुन्हा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर  श्री सुमित कोल्हे यांनी त्यांचा आज (दि. १४ मार्च) असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असुन त्या ऐवजी वृक्ष लागवड, शैक्षणिक  साहित्याचे गरजु विध्यार्थ्यांना  वाटप व विशेष  म्हणजे कोरोना लसीकरणासाठी गरजुंच्या नाव नोंदणी अभियानात तरूणांनी सहकार्य करावे, असे आवाहन सामाजीक माध्यमांद्वारे केले आहे.     


Post a Comment

0 Comments