समता पत संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लस घेण्याकरता मोफत नाव नोंदणी केंद्र सुरू.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----कोपरगाव शहरासह जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यात अग्रगण्य असलेल्या समता नागरी सहकारी पत संस्थेच्या वतीने मदतकेंद्र सुरू केले आहे. कोरोनोचा वाढता धोका लक्षात घेऊन शासनाने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील लस देण्याची सुरुवात केली आहे.
पण त्याकरिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी समता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे
विनामूल्य कोविड प्रतिबंधक लस नोंदणी मदतकेंद्र
सुरू करण्यात आल्याची माहिती समता नागरी चे संचालक श्री संदीप कोयटे यांनी दिली आहे. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले,
ज्या ६० वर्षांपुढील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करायची असल्यास त्यांनी
समता पतसंस्था, खंदक नाला जवळ, कोपरगाव
येथे संपर्क करावा.
सोबत आधारकार्ड व त्यास सलग्न असलेला मोबाईल आणणे आवश्यक आहे तसेच खाली दिलेल्या नंबरवर
संपर्क करून (- ०२४२३ २२५५५५ ) या संधीचा फायदा ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही श्री संदीप कोयटे यांनी केले आहे.
0 Comments