रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी आणला, यापुढेदेखील जास्तीत जास्त निधी आणणार.
शेतीपंपासाठी दिवसा विज मिळावी यासाठी प्रयत्नशील :- आ. आशुतोष काळे.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी जवळपास ५० कोटीचा निधी आणला. रस्ते विकासाचा अनुशेष मोठा आहे याची मला जाणीव असून रस्ते विकासासाठी यापुढे देखीलजास्तीत जास्त निधी आणणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोकमठाण येथे जिल्हा परिषद रस्ते दुरुस्ती गट ब कार्यक्रम सन २०१९/२० अंतर्गत २० लक्ष निधीतून रामा ३६ ते कोकमठाण रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन,तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आलेल्या धोत्रे ते घोयेगाव रस्त्याच्या मजबुतीकरण कामाचे लोकार्पण व खोपडी येथे मुख्य लेखाशिर्ष २५१५ ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत १० लक्ष निधीतून भिका नाथु वारकर घर ते देविदास जाधव घर रस्ता खडीकरण आणि १० लक्ष निधीतून शिवाजी वारकर घर ते बाबासाहेब वारकर घर रस्ता खडीकरण कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की, खराब रस्त्यांची दुरूस्ती व्हावी हि मतदार संघातील नागरिकांची अपेक्षा असून त्यांना होत सोसलेल्या त्रासाची मला जाणीव आहे. मतदार संघातील रस्त्यांना जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून आजपर्यंत अंदाजे ५० कोटी रुपये निधी रस्त्यांसाठी आणला आहे. मागील वर्षापासून संपूर्ण विश्वासह आपल्या देशावर व राज्यावर कोरोनाचे संकट होते व आजही आहे. यदाकदाचित कोरोनाचे संकट नसते तर मतदार संघात अनेक विकासकामे मार्गी लागले असते. मात्र कोरोना संकटामुळे आर्थिक व्यवस्था अडचणीत सापडल्यामुळे निधी मिळविण्यात काहीसा ऊशीर झाला असला तरी एवढ्या मोठ्या आर्थिक संकटात मतदार संघात रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहे. शासनदरबारी अनेक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे उर्वरित रस्त्यांसाठी देखील लवकरच निधी प्राप्त होवून या रस्त्यांचे काम सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मतदार संघात मागील काही वर्षापासून बिबट्यांचा संचार वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी जातांना अनेकवेळा बिबट्याने दर्शन दिले आहे. दिवसभर शेतात राबायचे आणि रात्री बिबट्याची भीती असतांना देखील जीव मुठीत घेवून रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरायला जायचे. रात्रीच्या वेळी हिंस्र श्वापदांसह अंधारात साप, विंचू यांची देखील भीती असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा त्रास कमी करून शेतकरी रात्री निवांत घरी झोपले पाहिजे यासाठी मतदार संघातील रस्ते विकासाबरोबरच शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे,सदस्य मधुकर टेके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक बाळासाहेब बारहाते, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनालीताई साबळे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, संचालक सुदाम लोंढे,राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,बाळासाहेब जाधव, विजय थोरात, विजय रक्ताटे, प्रकाश देशमुख, बाबासाहेब राऊत, सोपानराव काशीद, दिनकर रोहोम, संजय थोरात, ज्ञानेश्वर रक्ताटे,संजय दंडवते, आबा रक्ताटे, ज्ञानदेव जामदार, दिलीप बोरनारे, दादासाहेब साबळे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, उपअभियंता उत्तम पवार, ग्रामसेवक डी. बी. गायकवाड, कोकमठाण ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य तसेच चांगदेव चव्हाण, गणेश घाटे, संदीप जामदार, सुरेश कोतकर, दीपक घाटे, तात्याभाऊ काटे, रमेश देवकर,किरण माळोदे, अंबादास चव्हाण, तालिबभाई सय्यद,मनोज साखरे, नारायण जामदार, दादासाहेब जामदार,फकिरा वैद्य, संजय चव्हाण, विनायक देवकर,सीताराम पाडेकर, गणेश चव्हाण, बाळासाहेब वारकर, पुंजाहारी वारकर, शिवाजी वारकर,उपसरपंच संभाजी नवले, सुरेश वारकर, जालिंदर वारकर, दामोदर वारकर, देविदास वारकर, बाबासाहेब वारकर, शशिकांत पवार, मनोज जगताप, विठ्ठल शेवाळे, आदिनाथ वारकर, नितीन भवर, बाबासाहेब नवले, रोहिदास जाधव, योगेश पवार, चांगदेव शेवाळे,बापू वारकर, दत्तू वारकर, संजय जाधव, दादासाहेब वारकर, संतोष ठुबे, बाळासाहेब जाधव, शशिकांत वारकर, अमोल वारकर, ग्रामसेविका श्रीमती शिंदे,संदीप जाधव, भिका वारकर, ज्ञानदेव वारकर,साईनाथ काटे, सतीश शेवाळे, सुनील नवले, केशव वारकर, ज्ञानेश्वर वारकर, बाबासाहेब वारकर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments