आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आमदारआशुतोष काळेंच्या सूचनेवरून अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तहसीलदारांनी केली पाहणी.

आमदारआशुतोष काळेंच्या सूचनेवरून अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तहसीलदारांनी केली पाहणी.  



कोपरगाव प्रतिनिधी:---  कोपरगाव तालुक्यात रविवार (दि.२१) रोजी अचानक आलेला सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या   अवकाळी पावसामुळे  व काही ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे तसेच द्राक्ष, चिक्कू, डाळींब, टरबूज आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे आमदार आशुतोष काळे यांनी पहाणी करण्याच्या दिलेल्या सूचनेवरून तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी पाहणी केली.

कोपरगाव तालुक्यात रविवार (दि.२१) रोजी दुपारी ४.०० नंतर वातावरणात अचानक बदल होऊन आलेल्या वादळी वारा व मुसळधार पाऊस व काही ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे येत्या काही दिवसात काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे तसेच टरबूज,द्राक्ष, चिक्कू, डाळिंब, आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, शहापूर, बहादरपूर, जवळके,सोनेवाडी, बहादराबाद, मंजूर, सांगवीभुसार, रवंदे, वेळापूर आदी गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना सूचना करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास सांगितले होते. त्या सूचनेनुसार तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविला जाईल अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिली आहे. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे वीजप्रवाह देखील खंडीत झाला होता. त्याबाबत देखील आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणला सूचना देवून विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे सांगितले आहे.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रेगटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशीकृषी अधिकारी अशोक आढावपंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोमसंचालक सुनील शिंदेसचिन रोहमारेबाबुराव थोरातराहुल जगधनेगोकुळ पाचोरेदेवेन रोहमारेनंदकिशोर औताडेसंतोष वाकेबंडू थोरातराजेंद्र पाचोरेवसंत पाचोरेगोकुळ पाचोरे,रामनाथ पाडेकरशिवाजी राहणेगोपीनाथ रहाणे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments