शेतात पाणी भरत असताना महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जवळक्यातील दोघांवर गुन्हा दाखल
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:--- जवळके या ठिकाणी राहत असलेली महिला आपल्या मका या पिकाला गुरुवार १८मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाणी भरत असताना त्या भागात राहणारे बाळासाहेब महादेव घारे व सुनील माधव घारे हे दोघे तेथे आले व दोघांनी तक्रारदार महिलेला शेताला पाणी भरण्याच्या कारणावरून वाद केला व महिलेस शिवीगाळ व दमदाटी करून महिलेशी अश्लील वर्तन करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी वरील दोघांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील शहापूर या भागात राहणाऱी महिला आपल्या वावरामध्ये मका या पिकाला दुपारी अडीचच्या सुमारास पाणी भरत असताना तेथे आरोपी बाळासाहेब माधव घारे सुनील माधव घरे हे दोघे भाऊ त्या ठिकाणी गेले. पाणी भरण्याच्या कारणावरून पीडित महिलेस शिवीगाळ दमदाटी करून अंगावर धावून गेले. आरोपी बाळासाहेब माधव घारे व सुनील माधव घारे या दोघांनी पीडित महिलेस खाली पाडून तीचे कपडे फाडले व पीडित महिलेवर अतिप्रसंग केला. दरम्यान पीडित महिलेने आरडाओरडा केल्याने पीडित महिलेची सासू व भाऊ त्या ठिकाणी आले. मात्र घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुम्हाला फावड्याने जीवे मारू अशी धमकी देखील वरील दोन्ही आरोपींनी दिली. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शिर्डी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबरl१००/२०२१ भा.द.वि. कलम.३७६, ५११,३५४,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संजय सातव यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले हे करत आहे.
0 Comments