आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावमध्ये उद्यापासून पुन्हा कोविड केअर सेंटर सुरु – आमदार आशुतोष काळे.

 कोपरगावमध्ये उद्यापासून पुन्हा कोविड केअर सेंटर सुरु – आमदार आशुतोष काळे.

             




 


  कोपरगाव प्रतिनिधी:-----  राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने तालुकास्तरावर पुन्हा कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. कोपरगाव तालुक्यात देखील दररोज कोरोना रुग्ण आढळून येत असून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी गुरुवार (दि.४) पासून लायन्स मुकबधीर विद्यालय कोपरगाव येथे पुन्हा कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

            डिसेंबर-जानेवारी महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा काहीसा ओसरलेला असतांना फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती.परिस्थितीवर मिळविलेले नियंत्रण अबाधित राहावे यासाठी  महाविकास आघाडी सरकारने राज्यात पुन्हा एकदा कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी व कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेण्यासाठी खाजगी रुग्णालयात जाण्याची वेळ येवू नये यासाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. कोपरगाव तालुक्यात जरी रुग्ण आढळून येत असले तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कोरोना बाधित रुग्णांना योग्य उपचार व आवश्यक सोयी सुविधा मिळाव्या यासाठी आरोग्य विभागाला आवश्यक असणारी सर्वोतोपरी मदत केलेली आहे व यापुढे देखील जेवढी मदत आवश्यक असेल ती मदत करण्यात येईल. मात्र नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संपलेला नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाले असले तरी संकट मात्र कायम आहे. त्यामुळे अजूनही काही महिने सावधगिरी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी भविष्यात कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. मास्क चा नियमित वापर, सामाजिक अंतर व साबण अथवाहँडसॅनिटायझरने आपले हात वारंवार धुण्याचा नागरिकांनी कंटाळा करू नये. आपण लवकरच कोरोनावर मात करू. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरात बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याची वेळ आली. मात्र यापुढे एकदा बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याची वेळ येणार नाही याची खबरदारी घेवून नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. 


Post a Comment

0 Comments