आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावच्या ग्रामीण रस्त्यासाठी जिल्हा नियोजनमधून २ कोटी निधींचा मंजूर निविदा प्रक्रिया पूर्ण, लवकरच होणार कामाला सुरुवात: आमदार आशुतोष काळे.

कोपरगावच्या ग्रामीण रस्त्यासाठी जिल्हा नियोजनमधून २ कोटी निधी मंजूर

निविदा प्रक्रिया पूर्ण, लवकरच होणार कामाला सुरुवात: आमदार आशुतोष काळे.

            
 कोपरगाव प्रतिनिधी:-----   कोपरगाव  तालुक्यातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत २ कोटी रुपये निधी मंजूर  झाला आहे.या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या असून  लवकरच या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

               कोपरगाव विधानसभा मतदार संघातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली होती. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघातील विविध रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी निधी मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील कान्हेगाव, वेस, तिळवणी, मुर्शतपूर, देर्डे चांदवड, सावळगाव, ओगदी आदी गावातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे.

              यामध्ये इजिमा १२, इजिमा २ ते प्रजिमा ५ जोड रस्ता (कान्हेगाव ते वारी १ किमी), इजिमा १३ जिल्हा हद्द ते वेस ते काकडी १ किमी, इजिमा १४ जिल्हा हद्द ते तिळवणी, तिळवणी ते येवला हद्द  १ किमी., इजिमा १६० टाकळी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, मुर्शतपूर गाव ते मुर्शतपूर फाटा २ किमी., इजिमा २१३ हिंगणी ते देर्डे चांदवड ते डाऊच १ किमी., इजिमा ४ ते प्रजीमा १३ सावळगाव ते ओगदी १ किमी., इजिमा ६, इजिमा ४ ते ओगदी पढेगाव गाव रस्ता ओगदी १ किमी. आदि रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी सुमारे २ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. सर्वच रस्त्याच्या निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.  कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे विशेष प्रयत्न करीत आहे. या रस्त्यांना निधी उपलब्ध झाल्यामुळे या गावातील नागरिकांची मोठी अडचण दूर होणार असून मागील काही वर्षापासून रस्ता दुरुस्तीची मागणी पूर्ण झाल्यामुळे या गावातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे

Post a Comment

0 Comments