आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावच्या ग्रामीण भागातील रस्ते विकासाला मिळणार चालना जिल्हा परिषदेकडून रस्त्यांसाठी ३.४५ कोटी निधी मंजूर – आमदार आशुतोष काळे

कोपरगावच्या ग्रामीण भागातील रस्ते विकासाला मिळणार चालना

जिल्हा परिषदेकडून रस्त्यांसाठी ३.४५ कोटी निधी मंजूर – आमदार आशुतोष काळे





कोपरगाव प्रतिनिधी:-------  कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी अर्थसंकल्पीय अंदाज २०२१  जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण (३०५४) कार्यक्रमा अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरणासाठी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेकडून ३.४५ कोटी निधी मंजूर झाला असून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते विकासाला चालना मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

यामध्ये कोपरगाव तालुक्यातील प्रजिमा -५ ते मानाईवस्ती रस्ता (ग्रा.मा. ४४) खर्च (३० लाख),  करंजी फाटा ते प्रजिमा ५ ला मिळणारा रस्ता (ग्रा.मा. १८) (खर्च १५ लाख), रा.मा.३६ ते कोकमठाण रस्ता (ग्रा.मा. ४३) (खर्च १५ लाख), कोकमठाण माळेवाडी ते प्र.रा.मा. ८ ला मिळणारा रस्ता (ग्रा.मा.६८)  (खर्च २० लाख), रा.मा ७ ते कारवाडी रस्ता (ग्रा.मा २७ (खर्च ३० लाख), कारवाडी फाटा ते मंजुर रस्ता (ग्रा.मा.९९) (खर्च – १५ लाख), पोहेगाव ते वेस रस्ता (ग्रा. मा. ५२) (खर्च २० लाख), देर्डे चांदवड ते शिलेदारवस्ती रस्ता (ग्रा.मा १३१) कि.मी. (खर्च १५ लाख), कासली ते दहेगाव बोलका रस्ता (ग्रा.मा.७६) (खर्च १५ लाख),आंचलगाव ते करंजी रस्ता (ग्रा.मा.१६) (खर्च २० लाख), इजिमा ४ ते ओगदी, पढेगाव, सवंस्तर ते प्रजिमा ५ ला जोडणारा रस्ता (इजिमा ६) (खर्च १५ लाख), हिंगणी ते देर्डे चांदवड ते डाऊच.बु रस्ता (इजिमा २१३) (खर्च १५ लाख), इजिमा -२ ते कान्हेगाव प्रजिमा -५ जोड रस्ता (खर्च ३० लाख), प्रजिमा ५ ते (टाकळी) ते धारणगाव ते प्रजिमा ८ ला मिळणारा रस्ता (खर्च ३० लाख),येसगाव टाकळी, सोनारी रवंदे ते जिल्हा हद्द रस्ता (इजिमा २१६) (खर्च ३० लाख), नाशिक जिल्हा हद्द ते पोहेगाव बु. डोऱ्हाळे कनकुरी शिर्डी रस्ता (इजिमा ९) (खर्च- ३० लाख) असा एकूण ३.४५ कोटी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणाची कामे केली जाणार आहे.

रस्ते हे विकासाचे प्रतिक असून चांगले रस्ते ही नागरिकांची प्रमुख मागणी आहे. त्या दृष्टीने कोपरगाव तालुक्याच्या रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी जिल्हा परिषदेकडे केलेल्या पाठपुराव्यातून जिल्ह्यातील रस्त्यांना जोडणाऱ्या या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे या रस्त्यांचा दैनंदिन उपयोग होणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र यापुढेहि कोपरगाव तालुक्याच्या सर्वच रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा असाच सुरु राहणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे


Post a Comment

0 Comments