Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

विकासाचा अनुशेष मोठा, मात्र विकासाचे प्रश्न मार्गी लावू :- आमदार आशुतोष काळे

  विकासाचा अनुशेष मोठा, मात्र विकासाचे प्रश्न मार्गी लावू :- आमदार आशुतोष काळे

     


             

कोपरगाव प्रतिनिधी:--कोपरगाव विधानसभा मतदार संघात विकासाचा अनुशेष मोठा आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करतांना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच काही महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात यश देखील मिळाले. मात्र संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनने देशासह राज्याचे आर्थिक बजेट कोलमडले. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होवून मिळणाऱ्या विकास निधीत घट झाली आहे. तरीदेखील याचा परिणाम मतदार संघाच्या विकासावर होवू देणार नाही.  विकासाचा अनुशेष जरी मोठा असला तरी भविष्यात विकासाचे प्रश्न नक्की मार्गी लावू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

           कोपरगाव तालुक्यातील तिळवणी येथे सन २०२०-२१ जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत २१.७३ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या तिळवणी ते येवला हद्द व सावळगाव येथे २१.७३ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या सावळगाव ते ओगदी रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

             यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोरोना संकटामुळे राज्याचे उत्पन्न कमी झाल्यामुळे निधी कमी मिळाला असला तरी मिळणाऱ्या निधीतून दर्जेदार विकासकामे करण्यावर भर देत आहे. कोरोनाचे संकट नसते तर मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असता. सत्ताधारी पक्षाचा आमदार असतांना किती निधी मिळतो हे मतदार संघातील जनतेला दाखवून दिले असते. निधी कमी मिळत असल्यामुळे माझे पण समाधान होत नाही त्यासाठी सातत्याने मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असून त्या प्रयत्नातून विकासाचा अनुशेष नक्की भरून निघेल असा आशावाद आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. यावेळी तिळवणीचे नवनिर्वाचित सरपंच गोविंद पगारे व उपसरपंच नानासाहेब गायके यांचा आमदार आशुतोष काळे यांनी सत्कार केला.

              यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधनेउपसभापती अर्जुन काळेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोमसंचालक बाळासाहेब बारहातेकारभारी आगवनराष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगरजिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदारसांडूभाई पठाणराहुल जगधनेसरपंच गोविंद पगारेउपसरपंच जयश्रीताई गायकेनाना गायकेअशोक वाघ, संदीप शिंदेचंद्रकांत गायकेपोपट शिंदेपुंडलिक चक्केभाऊसाहेब शिंदेशिवाजी वाघआण्णा शिंदेज्ञानेश्वर पगारेनिलेश वाघराजेंद्र गायकेरवींद्र चक्केभास्कर शिंदेअक्षय घुलेतसेच शिरसगावच्या सरपंच सौ. मंगलताई उकिरडेअरुण गायकवाडसौ. वैशालीताई भवरअशोक उकिरडे, देविदास भोरकडेभाऊसाहेब उकिरडेबद्रीनाथ उकिरडेअण्णासाहेब उकिरडेविनायक उकिरडेदादासाहेब उकिरडेरेवणनाथ उकिरडेआंबदास गायकवाडपोपट गायकवाडगणेश कुऱ्हाडेसुदाम उकिरडे,सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रशांत वाकचौरेग्रामसेवक योगेश देशमुख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments