आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सोन्याचे मंगळसूत्र चोरुन पळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना नागरिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात.

 सोन्याचे मंगळसूत्र चोरुन पळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना नागरिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात.

कोपरगाव बसस्थानकातील प्रकार.




कोपरगाव प्रतिनिधी:---
कोपरगाव शहरातील बसस्थानकामध्ये आपल्या नातेवाईकाच्या इथे कार्यक्रमाला आले असलेल्या सटाणा येथील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन पळणाऱ्या दोन महिला चोरट्यांना प्रवाशांसह नागरिकांनी पाठलाग करून पकडून दिल्याची घटना घडली याबाबत पोलीस स्टेशन कडून समजलेली माहिती अशी की कोपरगाव शहरातील बसस्थानकामध्ये शनिवार 20 रोजी दुपारच्या सुमारास सौ रेखा नानाजी चव्हाण वय 36 राहणार धांद्री तालुका सटाणा जिल्हा नाशिक या येथे आपल्या इथे जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्या परत जात असताना दुपारी कोपरगाव बस स्थानक येथे आल्या होत्या यावेळी दोन अज्ञात  अल्पवयीन मुली (चोरट्या ) यांनी गर्दीचा फायदा घेत रेखा चव्हाण यांच्या अवतीभवती फिरुन त्यांची नजर चुकून त्यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे किंमत 24 हजार रुपये ओरबडून पळाल्या मात्र ही गोष्ट लक्षात येताच रेखा चव्हाण या आरडाओरडा करू लागल्या ही गोष्ट इतर प्रवाशांचे नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी या दोन अल्पवयीन चोरी करणाऱ्या मुलींना भाजी मार्केट रोड या ठिकाणी पकडले व तात्काळ पोलीस स्टेशनला कळवले यावेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या दोन मुलींना  ताब्यात घेतले   या घडलेल्या प्रकाराबाबत रेखा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर८९/२०२१ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार एस.सी. पवार हे करत आहे. कोपरगाव बस स्थानका मध्ये सध्या बसस्थानकाचे काम सुरू असून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे यामुळे अनेक महिला प्रवाशांच्या ज्येष्ठ नागरिकांची बस पकडताना मोठी धावपळ होते याचाच फायदा अशा प्रकारच्या चोरट्यांना होत आहे तरी ही गैरसोय टाळावी यासाठी बस स्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांमधून होत आहे

Post a Comment

0 Comments