कोपरगावचा खेळाडू लवकरच देशाच्या संघात चमकावा - युवानेते विवेकभैय्या कोल्हे.
कोपरगाव प्रतिनिधी:----- टिळक चौक क्रिकेट क्लब आयोजित विवेकभैय्या चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी व पारितोषिक वितरणासाठी अहमदनगर जिल्हा सह.बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन युवानेते श्री.विवेकभैय्या कोल्हे उपस्थित होते..
युवानेते विवेकभैय्या कोल्हे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या - उपविजेत्या व पारितोषिक प्राप्त संघांना आणि उत्कृष्ट खेळाडूंना सन्मानित करण्यात आले तसेच विशेष पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले.
आपल्या कोपरगाव सारख्या ठिकाणाहूनही देशपातळीवर खेळाडू जाण्यासाठी आपण सहकार्य करणार आहोत व उत्कृष्ट खेळाडू अशा क्रिकेट चषकाच्या माध्यमातून पुढे येतील त्यामुळे लवकरच आपला कोपरगावचा झेंडा भारतीय संघात लावण्यात खेळाडू यशस्वी होतील असा मला विश्वास आहे व त्यासाठी आपले सहकार्य असणार आहे असे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.पुढे मनोगत व्यक्त करतांना विवेकभैय्या म्हणाले की फैयाज तांबोळी सारखा एक धावपटू हा टाकळी सारख्या ग्रामीण भागातून देशाचे प्रतिनिधित्व करून देशासाठी गोल्ड मेडल मिळवून देतो हे यश आपल्या सर्वांची अभिमानाने मान उंचावणारे आहे.
ग्रामीण भागात अनेक स्पर्धा भरवल्या जातात.क्रिकेट प्रमाणेच सर्वच क्रिडा प्रकारातील स्पर्धांचे आयोजन तरुणांनी एकत्र येऊन करावे.माझी युवकांना नेहमी साथ आहे आणि नेहमी राहील कारण आपल्या भागातून उत्तम खेळाडू तयार झाले पाहिजे.मी स्वतः देखील प्रवासात असताना यु ट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला.अनेक खेळाडूंचे कौशल्य आणि रोमांचक खेळ खिलाडू वृत्तीने खेळणारे संघ पाहिले.हि चषक स्पर्धा सर्वत्र आदर्श वाटेल अशी ठरली आहे.
विजेत्यांचे अभिनंदन आणि जे पराजित झाले त्यांनी खचून न जाता पुढील स्पर्धेसाठी उत्तम तयारी करावी कारण अस म्हणतात हार के भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं..!
सर्व सहभागी खेळाडू,संघमालक,आयोजक यांचे अभिनंदन व ऑनलाइन यु ट्यूब वर ही स्पर्धा बघणाऱ्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक,उपस्थित क्रिडाप्रेमी नागरिक आणि तांत्रिक समन्वयक सर्वांचे विवेकभैय्या कोल्हे यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी अभिनंदन केले.
या प्रसंगी डी.आर काले,आयोजक अशोकभाऊ लकारे,विनोद राक्षे,शिवाजीआप्पा खांडेकर,रवींद्र रोहमारे,अल्ताफभाई कुरेशी,अविनाश पाठक,सोमनाथ अहिरे,पिंटूभाऊ नरोडे,नरेंद्र लकारे,जालिंद्र शिंदे,सतीश रानोडे,शंकर बिऱ्हाडे,जगदीश मोरे,हसनभाई पटेल,विजयराव गायकवाड,विशाल गोर्डे,दिलीप पारखे,संजय खरोटे,कैलास मंजुळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजक अशोकभाऊ लकारे,प्रा.कुटे सर,जगदीश लकारे,सचिन लकारे,रवींद्र लचूरे,कन्हैया गंगूले,स्वराज लकारे,ओंकार जाधव,ईश्वर लकारे,कुणाल गंगूले,आनंद राक्षे,सागर ढोणे,विशाल लकारे,बजरंग जाधव,राहुल आढाव,शमीत माळी,राजेंद्र मेहरे,किशोर लकारे,जितू पंजाबी,सिद्धश लकारे,हर्षद लचुरे,अलतमेज शेख,असिफ शेख,दादा मुसमाडे,हरिहर जाधव,रोहन लकारे,आशिष मेहत्रे,संदीप दुधाळ,सोमनाथ शिंदे,वसीम पटेल,विजय डांगे,अशोकभाऊ पवार,सुमित खरात,शाम पंडोरे,आकाश लकारे आदींसह टिळक चौक क्रिकेक क्लबच्या अनेक युवकांनी विवेकभैय्या चषकाचे उत्तम आयोजन केले होते
0 Comments