अंचलगाव व परिसरातील विकासाचे प्रश्न मार्गी लावू – आमदार आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:---- कोणत्या गावात सत्ता कुणाची आहे हे पाहत नाही. मतदार संघातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे करीत आहे. त्या उद्देशातून अंचलगावला जिल्हा परिषदेच्या शाळा खोलीची अडचण सोडविली. त्याचबरोबर आमदारनिधीतून अंचलगाव चौकी ते अंचलगाव या महत्वाच्या रस्त्यासाठी निधी दिला. अंचलगाव, ओगदी हि गावे जरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असली तरी माझ्यासाठी हि गावे देखील मतदार संघातील इतर गावांप्रमाणे तेवढीच महत्वाचे आहेत. त्यामुळे अंचलगाव मधील नकाशावर नसलेले जवळपास ११ किलोमीटरचे तीन रस्ते व ओगदी गावातील महत्वाचे दोन रस्ते नकाशावर घेवून त्या रस्त्यांना निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत अंचलगावसह परिसरातील गावांच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत १० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या अंचलगाव रेल्वे चौकी ते अंचलगाव रस्ता खडीकरण कामाचे भूमीपूजन तसेच ओगदी येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०.७३ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या इजिमा ४ ते ओगदी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे तसेच आमदार आशुतोषदादा काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत १० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या ओगदी ते बोकटे रस्ता खडीकरण कामाचे भूमीपूजन आमदार. आशुतोषकाळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोरोनाचे संकट व विकासकामांचा अनुशेष भरून काढण्याचे आवाहन सोबतीला घेवून मतदार संघाच्या विकासकामांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील वर्षी आलेले कोरोना संकट वर्षअखेरीस उतरणीला लागले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना संकटाने पुन्हा डोके वर काढले असून एकून परिस्थिती पाहता हे संकट काहीसे घातक असल्याचे दिसत आहे. कुटुंबातील एका बाधित व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंब बाधित होत असल्याचे आढळून येत आहे. पूर्वीच्या कोरोना लक्षणामध्ये अजून काही लक्षणांची भर पडली आहे. त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा आपणा सर्वांची जबाबदारी वाढली आहे त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. मास्क, सामाजिक अंतर व सॅनीटायझरचा वापर करून किंवा साबणाने आपले हात वारंवार धुवून आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, कारभारी आगवन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय आगवन, जिनिंग व प्रेसिंगचे उपाध्यक्ष गणेश गायकवाड, ओगदीच्या सरपंच सौ. अलकाताई लालचंद जाधव, उपसरपंच सोमनाथ जाखु जोरवर,अंचलगावच्या सरपंच सौ. मंगलताई भाऊसाहेब खिरडकर, उपसरपंच लिलाबाई फकीरराव शिंदे, सांडूभाई पठाण, पोलीस पाटील अनिल चरमळ, दिनकर मोरे, किरण कुदळे, गोपाल कुलकर्णी, सतीश शिंदे सुरेश जोरवर, बाळासाहेब भालेराव, तान्हाजी जोरवर, राजाराम जोरवर, गणेश गोणटे, वसंत गोणटे, भास्कर गोणटे, संजय गोणटे,अण्णासाहेब कोल्हे, भास्कर सोनार, संदीप सावंत,महेश घाटे, संतोष सदगीर, बाळासाहेब सोनवणे, रमेश सोनवणे, कैलास माने, प्रकाश गायके, रामेश्वर शिंदे,संदीप शिंदे, नितीन शिंदे, सुनील शिंदे, नवनाथ शिंदे,भाऊसाहेब येवले, विठ्ठल पाठक, पोपट शिंदे,दादासाहेब बनसोडे, निहाल शेख, सुखदेव शिंदे,जालिंदर हुळेकर, भाऊसाहेब शिंदे, प्रसाद वाणी, श्री देशमुख, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,उपशाखा अभियंता लाटे, कनिष्ठ अभियंता गौरव सोनवणे, अंचलगावचे ग्रामसेवक बी.के.बागुल, ओगदीचे ग्रामसेवक रफिक सय्यद आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments