आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

फळ प्रकिया प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची संधी :- सौ. पुष्पाताई काळे

    फळ प्रकिया प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची संधी :- सौ. पुष्पाताई काळे

     कोपरगाव प्रतिनिधी:----  बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून विविध व्यवसायांच्या प्रशिक्षणाबरोबर अनेक उपक्रम राबवून बचत गटाच्या महिला उद्योगाला चालना दिली जात आहे. आमदार आशुतोष  काळे यांच्या संकल्पनेतुन सुद्धा महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने अनेक प्रशिक्षणे हाती घेण्यात आली आहे.मात्र सध्या कोरोना संकटामुळे सर्वच छोट्या-मोठ्या व्यवसायांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाने फळ प्रकिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरु केल्या असून अनेक शेतकरी फळ प्रकिया उद्योगाकडे वळले आहेत. मात्र या उद्योगासाठी प्रशिक्षित कामगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे फळ प्रकिया प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची संधी असल्याचे प्रतिपादन  प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सौ. पुष्पाताई काळे यांनी केले.

               महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आत्मा अंतर्गत कौशल्याधारीत कामे करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महिलांना फळे व भाजीपाला प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने,नगरसेविका वर्षाताई गंगूलेतालुका कृषी अधिकारी अशोक आढावकृषी पर्यवेक्षक सुनील गाविततालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) शैलेश आहेरकृषी सहाय्यक तुषार वसईकर आदींसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

         यावेळी तज्ञ प्रशिक्षक सतीश नेने यांनी महिलांना फळ प्रक्रिया उद्योगासंदर्भात प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. प्रक्रिया उद्योगातील संधी व गरज यावर मार्गदर्शन करून फळे व भाजीपाला यावर करण्यात येणाऱ्या विविध प्रक्रिया यावर सखोल माहिती दिली.सर्व फळांच्या विविध प्रक्रिया समजावून सांगितल्या तसेच विविध यंत्रसामग्रीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित महिलांना माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश आहेर यांनी केले. यावेळी उपस्थित महिलांनी शेतावर शिवार फेरी करून विविध औषधी वनस्पतींची व पिकांची माहिती घेतली.

Post a Comment

0 Comments