आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पो. कॉ. संदीप काळे बनले पोलीस उपनिरीक्षक. खाते अंतर्गत लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

 पो. कॉ. संदीप काळे बनले पोलीस उपनिरीक्षक.

खाते अंतर्गत लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्णकोपरगाव प्रतिनिधी:----
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गेल्या पाच वर्षापासून कार्यरत असलेले आणि महिनाभरापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बदलून गेलेले पोलीस कॉन्स्टेबल संदिप शांताराम काळे वय 29 वर्ष यांनी खात्या अंतर्गत घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.सन २०१७ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली होती याचा निकाल नुकताच जाहीर झालं असून ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात संदीप काळे उत्तीर्ण झाले आहे.अत्यंत जिद्द आणि चिकाटीने काळे यांनी सदर यश संपादन केल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

              संदिप काळे मूळचे नेवासा तालुक्यातील वाकडी गावचे रहिवासी आहे, त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वाकडी येथे झाले आहे महाविद्यालयीन शिक्षण नेवासा तालुक्यातील भेंडा येथे झाले आहे, सन २०१२ साली ते अहमदनगर पोलीस दलात भरती झाले, व २०१५ साली त्यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली, शांत स्वभाव व कष्ट करण्याची तयारी असल्याने त्यांना हे यश मिळाले आहे,आपली ड्युटी संपल्यानंतर मिळालेला वेळ वाया न घालवता ते एमपीएससीचा अभ्यास करत होते,सतत घेतलेल्या परिश्रमाने त्यांना हे यश मिळाले असून कर्तव्यावर असताना देखील कष्ट करून पोलीस उपनिरीक्षक झाल्याने संदीप काळे इतर तरुणांसाठी उत्तम उदाहरण आहे.त्यांना वरीष्ठ पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments