आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी पुरवठा योजनांचे कामे तातडीने पूर्ण करा. – आ. आशुतोष काळे

 संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी पुरवठा योजनांचे कामे तातडीने पूर्ण  करा.  आ.आशुतोष काळे

                  

कोपरगाव प्रतिनिधी ---- उन्हाळा सुरु होत असून भविष्यात नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेवून ग्रामपंचायत पदाधिकारी व पंचायत प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहे.

            पंचायत समितीच्या सर्व विभागाची वार्षिक आढावा बैठक नुकतीच आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी पंचायत समिती प्रशासनाला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, उन्हाळा सुरु होत आहे. पाणी टंचाई समस्या उदभवणार नाही यासाठी वेळेत उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने सतर्क राहावे. सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मागील वर्षी कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना ग्रामीण भागात ज्या उपाय योजना केल्या त्या उपाययोजना आवश्यक त्या ठिकाणी राबवा. १४ व्या वित्त आयोगातील शिल्लक राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करा. १५ व्या वित्त आयोगाच्या मिळणाऱ्या निधीतून नागरिकांना अपेक्षित असलेली व नागरिकांच्या गरजेची कामे ओळखून कामे प्रस्तावित करा. १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करतांना काळजी घेवून कामाची गुणवत्ता चांगली राहील याची काळजी घ्यावी. जनतेचे सेवक या नात्याने ती आपली जबाबदारी असून त्यातूनच खऱ्या अर्थाने लोकहित साधले जाणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

                  यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधनेउपसभापती अर्जुनराव काळेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोमजिल्हा परिषद सदस्या सौ. सोनालीताई रोहमारेपंचायत समिती सदस्य श्रावण आसणेअनिल कदमजिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदारगटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशीउपगटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळेवैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. वैशाली बडदेउपअभियंता उत्तम पवारकृषी अधिकारी पंडित वाघिरेसर्व गावांचे ग्रामविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

         

चौकट :-


 हि किमया आमदार आशुतोष काळेंची ----

                        जागेची अडचण असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांसाठी एक गुंठ्याची खरेदी फक्त कोपरगाव तालुक्यातच होते. इतर तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी भूमी अभिलेख एक गुंठ्याचे खरेदीखत करून देत नाही. हि किमया आमदार आशुतोष काळे यांनी करून दाखविली असून त्यामुळे स्वत:ची जागा नसलेल्या अनेक लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे - सचिन सूर्यवंशी (गटविकास अधिकारी)

Post a Comment

0 Comments