Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

चांगल्या रस्त्यांशिवाय मतदार संघाचा विकास अशक्य : आमदार आशुतोष काळे

            चांगल्या  रस्त्यांशिवाय मतदार संघाचा विकास अशक्य : आमदार आशुतोष काळे

        






   


कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा विकास साधण्यासाठी सर्वच रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. मतदार संघातील सर्वच प्रमुख रस्ते दर्जेदार करण्यासाठी व प्रत्येक गावांना जोडणारे सुरक्षित आणि चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून चांगल्या रस्त्यांशिवाय मतदार संघाचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

             कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथे सन २०२०-२१ जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत ४३.४६ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या मुर्शतपुर फाटा ते मुर्शतपुर गाव रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत ३ लक्ष निधीतून मुर्शतपुर ते टाकळी शिव रस्ता मुरुमीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की, दळणवळणाच्या दृष्टीने नागरिकांना चांगल्या दर्जाची रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे. मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटाचे आवाहन असतांना रस्त्यांसाठी निधी मिळाला आहे. मतदार संघातील अनेक रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोना संकट कमी कसे होईल यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत तरीदेखील प्रत्येक नागरिकांनी आपली सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी समजून सर्वांनी कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

                  यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोमसंचालक हरिभाऊ शिंदेराहुल जगधनेसरपंच सौ. साधनाताई दवंगेउपसरपंच सौ. मनिषाताई गिरमेअनिल दवंगेविष्णु शिंदेनितीन शिंदेरोहिदास मोरेसंदीप बारवकरप्रविण गुंजाळसुनील गिरमेआण्णासाहेब शिंदेभाऊसाहेब शिंदेहारुणभाई शेखरामदास केकाणसार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत वाकचौरेदिलीप गाडेग्रामसेवक राजपूतसर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments