आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

प्रशासनाच्या माध्यमातून कोपरगावमध्ये १५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु. :---माजी.आमदार सेन्हलताताई कोल्हे.

  प्रशासनाच्या  माध्यमातून कोपरगावमध्ये १५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु. :---माजी.आमदार सेन्हलताताई कोल्हे.





कोपरगाव प्रतिनिधी:----  आज एस. एस. जी. एम. महाविद्यालयात १५० बेडच्या सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु होत आहे. यामुळे  कोपरगावमधील  रुग्णांना उपचारासाठी कोपरगावबाहेर जाण्याची चिंता मिटली आहे. आपण सातत्याने कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची सातत्याने  मागणी करीत होतो, 'परंतु देर आये दुरुस्त आये' काहीही असो दखल घेतली हे महत्त्वाचे आपण  प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे 


कोपरगाव मतदार संघामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची सुरुवात झाल्यापासूनच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची, रुग्णसेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आपण  १५ फेब्रुवारी एका निवेदनाद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे केली होती. अशी माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बोलताना दिली

माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या कोपरगावात सोमवारी (१५) रोजी कोरोनाचे ३० रूग्ण आढळल्याने आता कोरोना रूग्णांची संख्या २३६ वर पोचली त्यामुळे पुन्हा  एस. एस. जी. एम. महाविद्यालयात पुन्हा कोविड
सेंटर सुरू करण्याची हीच योग्य वेळ  असल्याचे  आपण सोमवारी (१६) रोजी म्हटले होते. या मागणीची दखल घेत आज गुरुवारी (१७)  रोजी   जिल्हा प्रशासनाने  कोपरगावकरांंसाठी कोरोनाबाधित रुग्णांवर  कोपरगाव मध्येच उपचार करण्यासाठी एस एस जी एम महाविद्यालयात १५० बेडच्या सुसज्ज कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. यामुळे  कोपरगावमधील  रुग्णांना उपचारासाठी कोपरगावबाहेर जाण्याची चिंता मिटली आहे. प्रशासनाने घेतलेल्या घेतलेल्या या निर्णयाचे आपण  स्वागत करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे

कोपरगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची सुरुवात झाल्यापासूनच कोविड-१९ सेंटर उभारावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा , कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे  यांनी केला होता. अखेर जिल्हा प्रशासनानेही  मागणीची दखल घेतली. या आज गुरूवारी (१७)रोजी  कोपरगाव येथील कॉलेजमध्ये  १५० बेड आणि रुग्णवाहिका सेवेसह कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे .या सेंटरमुळे कोपरगाव मतदार संघातील  नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments