वाड्या वस्त्यांना व शेजारील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा देखील विकास करणार - आ. आशुतोष काळे.
कोपरगाव प्रतिनिधी:---- ज्याप्रमाणे प्रमुख जिल्हा मार्गांचा विकास होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांना व शेजारील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा देखील विकास होणे गरजेचे आहे. या रस्त्यांचा विकास झाला नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या खराब रस्त्यामुळे दूरच्या रस्त्याचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे जनतेचा आर्थिक खर्च तर वाढतोच पण वेळही वाया जातो. त्यामुळे मतदार संघातील सर्वच प्रमुख रस्त्यांचा विकास करतांना ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांना व शेजारील गावांना जोडणारे रस्ते देखील रडारवर असून वाड्या वस्त्यांना व शेजारील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा देखील विकास करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथे आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत १० लक्ष निधीतून रोमेश बोरावके शेती ते पवार वस्ती रस्ता खडीकरण कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सायकल योजने अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांच्या समाजकल्याण सेस फंडातून अनुसूचित जाती जमातीतील ३७ गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनींना सायकलचे वाटप आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शाळा खोल्या, अंगणवाडी इमारत बांधल्या तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. जिल्हा परिषदेकडे तालुक्यातील अनेक शाळा खोल्यांचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्या कामांना मंजुरी मिळून ती कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. यापुढील काळात देखील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या अखत्यारीत असलेले विकासाचे प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांच्या मदतीने मार्गी निश्चितपणे लागणार असून जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक तिरसे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, राहुल जगधने, रामकृष्ण बनकर, अनिल बनकर, रमेश ताम्हाणे, विक्रम कोकाटे, रोमेश बोरावके, श्रीराम राजेभोसले, सचिन क्षीरसागर, प्रविण जाधव, अनिल खरे, पोपटराव गांगुर्डे, शंकरराव फटांगरे, साईनाथ कोकाटे, निरंजन बनकर, देवा खुळे, सुनील महाजन, उपअभियंता पवार, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, ग्रामसेवक प्रशांत भिसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments