रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सार्वजनिक बांधकामाच्या विरोधात ॲड.योगेश खालकर यांच्यासह ग्रामस्थांनी केले आंदोलन.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- तालुक्यातील महत्वाचा असलेला जवळके बहादरपुर रस्त्याला ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे तसेच काहींना अपंगत्व देखील आलेले आहे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा तोंडी व लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन देखील झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याने ॲडव्होकेट योगेश खालकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी दि. ४ मार्च रोजी रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून व केक कापून या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून अभिनव आंदोलन केले आहे. या आंदोलनाविषयी माहिती देताना ॲड. खालकर म्हणाले की आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला २७जानेवारी रोजी रस्ता तातडीने दुरुस्ती करावी यासाठी निवेदन दिले होते मात्र अद्याप पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही या रस्त्यावरून पाई येणारे साई बाबांचे हजारो साई भक्त, तसेच पालखी घेऊन येणारे भक्त, व हजारो प्रवाशी, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात खराब रस्त्यामुळे अनेक अपघात झाले आहे.
![]() |
प्रसंगी अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तर काही प्रवाशांना अपंगत्व देखील आले आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना देखील सार्वजनिक बांधकाम याची साधी दखल घेऊन किमान खड्डे देखील बोलू शकत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह आज हे आंदोलन केले आहे तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा यापेक्षाही उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ॲड. खालकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे मी आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण दादा थोरात, बाबुराव भाऊ थोरात सरपंच जवळके, रामभाऊ थोरात माजी उपसरपंच, अशोक नेहे, नानासाहेब नेहे, ज्ञानदेव नेहे, शिवाजी नेहे, सिताराम दरेकर, ॲड. रमेश गव्हाणे, किसन पाडेकर, अमोल पाडेकर, पोपट नेहे, वाल्मीक नेहे, संतु थोरात, गोपीनाथ रहाणे उपसरपंच बहादरपूर, रामेश्वर गव्हाणे, आदिसंह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments