आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

साईबाबा संस्थान च्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पाठपुरावा करणार. --- राज्यमंत्री डॉक्टर रघुनाथ कुचिक

 साईबाबा संस्थान च्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पाठपुरावा करणार.

  --- राज्यमंत्री डॉक्टर रघुनाथ कुचिक



 शिर्डी प्रतिनिधी: ------ श्रद्धा आणि सबुरी ची शिकवण  देणार्‍या साईबाबांच्या दानपेटीत कोट्यावधी रुपयाची दान पडत असताना वर्षाकाठी कोट्यावधी भक्त साई दर्शनासाठी येत असताना शिर्डी  साईबाबा संस्थानवर  विश्वस्त मंडळ आले पाहिजे व कायम कामगार व कंत्राटी कामगार हा भेदभाव नष्ट झाला पाहिजे २७०० कंत्राटी कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे व भरिव  पगारवाढ तात्काळ मिळावी  यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री डॉक्टर रघुनाथ कुचिक यांनी कामगार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणात सांगितले यावेळी कामगार नेते ज्ञानेश्वर पवार विठ्ठल पवार सामाजिक कार्यकर्ते सतिश गंगवाल महिंद्र कोटस्थाने शिवाजी चौधरी मुकुंद सिंनगर  सचिन कोते आदींसह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

  यावेळी बोलताना डॉक्टर रघुनाथ कुचिक म्हणाले की शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे या ठिकाणी विश्वस्त मंडळ नसल्याने ते लगतच्या काळात आले पाहिजे साईबाबा संस्थान मध्ये कामगार मोठ्या प्रमाणावर साईभक्तांना सेवा देतात अशा वेळी कायम कामगार व ठेकेदारी कामगार असा भेदभाव करणे हा कामगारावर मोठा अन्याय असून गेल्या अनेक वर्षापासून २७००  पेक्षा जास्त कर्मचारी विविध विभागात कंत्राटी पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून माफक अशा  पगारावर काम करत असताना त्यांना भरीव स्वरूपात पगारवाढ का दिली जात नाही हा  संशोधनाचा विषय आहे ती  देण्याची गरज असून त्यांना कायम करून शासकीय नियमाप्रमाणे पगारवाढ करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून या कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले कायम कंत्राटी  शब्द प्रयोग करून अनेक दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने त्याला न्याय देण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले यावेळी मोठ्या प्रमाणावर कामगार मोठ्या संख्येने हजर होते यावेळी कामगारांच्या वतीने ज्ञानेश्वर पवार  व शिवसेना कार्यक्रत्यानी  त्यांचा सत्कार केला यावेळी विठ्ठल पवार यांनी साईबाबा संस्थान मध्ये गेल्या अनेक वर्षापासून ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या गेल्या अनेक वर्षापासून योगदान देणाऱ्या सर्वच कामगारांना न्याय मिळाला पाहिजे महा आघाडी सरकारने  त्यांना न्याय दिला पाहिजे  भरीव स्वरूपात पगार वाढ मिळावी  शासकीय नियमाप्रमाणे सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी जोरदार  मागणी केली यावेळी ज्ञानेश्वर पवार यांनी कामगारांच्या वतीने सर्वांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments