अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी त्वरीत द्यावे - मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :---- कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे लेखीपत्राद्वारे केली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अचानक जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट आल्याने हातातोंडाशी आलेली पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षेगहू,पेरू,कांदे,हरभरा यांचे नुकसान होऊन अक्षरशः हार्वेस्टिंग होऊ घातलेली पिके अनेक ठिकाणी पाण्याने मातीमोल झाली आहेत अशी वस्तुस्थिती आहे.
एका बाजूला जगभरासह मतदारसंघातही कोरोनाने मोठा उद्रेक केला असून त्यात हे दुहेरी संकट आल्याने मतदारसंघात मोठे निराशाजनक वातावरण या नैसर्गिक संकटाने निर्माण झाले आहे.
या गोष्टीची प्राधान्याने दखल घेत स्थानिक प्रशासनाने पंचनामे करून झालेल्या नुकसानीची नोंद करून घ्यावी व शेतकरी बांधवांना या संकटात दिलासा द्यावा अशी विनंती माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे
0 Comments