आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत गौतम बँकेने प्रगतीची वाट टिकवून ठेवली अभिमानस्पद – मा. आ. अशोकराव काळे

 कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत गौतम बँकेने प्रगतीची

वाट टिकवून  ठेवली अभिमानस्पद – मा. आ. अशोकराव काळे

कोपरगाव प्रतिनिधी:----- मागील आर्थिक वर्षाची सांगता होत असतांनाच जगभर थैमान घालीत असलेल्या जीवघेण्या कोरोना माहामारीने आपल्या देशात व राज्यात पाय पसरण्यास सुरुवात केल्यामुळे देशात व राज्यात अघोषित टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे सर्वच व्यवहार, उद्योगधंदे बंद पडले. त्या टाळेबंदीचा विपरीत परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला त्यास बँकिंग क्षेत्रही अपवाद नव्हते. अशा परिस्थितीत दिलेल्या कर्जाचीवसुली होणे हे मोठे आव्हान होते. हे आव्हान गौतम बँक व्यवस्थापनाने स्वीकारून बँकेचे सभासदांना व खातेदारांना आर्थिक झळ बसू न देता कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत बँकेने प्रगतीची वाट टिकवून ठेवली हे अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले आहे.

सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या व कोपरगाव तालुक्यासह शेजारील तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक गरजा भागवणारी असा नावलौकिक असणाऱ्या गौतम सहकारी बँकेची २०१९-२० या वर्षाची ४५ वी  वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार बँकेच्या सभागृहात मुख्य शाखा कोळपेवाडी येथे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना माजी आमदार अशोकराव काळे बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या काटकसरीच्या धोरणानुसार आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत उत्तुंग भरारी घेतली आहे. बँकेच्या प्रगतीची दखल घेवून बँकेस राष्ट्रीय पातळीवरील ग्रामीण नागरी सहकारी बँक या प्रवर्गातून दिला जाणारा “ बँको ब्लू रिबन अवार्ड २०२०”  घोषित करण्यात आल्यामुळे बँकेने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.  बँकेने ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांना लघु व कुटीर उद्योग व्यवसाय सह शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे माध्यमातून चांगल्या प्रकारे कर्जाचे वितरण केलेले आहे. बँकेस याहीवर्षी ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून दि.३१ मार्च २०२० ला गौतम बँकेच्या ठेवी रु.९३ कोटी ५१ लाख होत्या त्या आजमितीस रु.९८ कोटी च्या वर असून बँकेचे पारदर्शक व्यवहारामुळे लॉकडाउन काळात देखील ठेवीत वाढ झालेली आहे. दि.३१ मार्च २०२१ पर्यंत बँकेचे डिपॉझीट रु.१००/-कोटींच्या पुढे निश्चितपणे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचे विद्यमान चेअरमन,व्हा.चेअरमन तसेच बँकेचे विद्यमान संचालक मंडळ बँकेचे सर व्यवस्थापक बापूसाहेब घेमुड साहेब,अधिकारी,सर्व कर्मचारी यांनी अहवाल सालात बँकेच्या प्रगतीसाठी चांगले काम केले आहे. कर्जवाटपाचे वेळी गरज म्हणुन कर्ज घेतले जाते मात्र गरज पूर्ण झाल्यावर त्या कर्जाची  परतफेड जाणीवपूर्वक टाळली जाते ही गंभीर बाब आहे. नव्याने वाटप करण्यात आलेले कर्ज थकणार नाहीत व जी कर्जे नियमित राहतील यासाठी संचालक मंडळ व सेवक वर्गाने कायम स्वरूपी लक्ष देऊन नियंत्रण ठेवावे अशा सूचना माजी आमदार अशोकराव काळे यांनी यावेळी केल्या.

            प्रास्तविक करतांना बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते म्हणाले की, मागील वर्षापासुन संपुर्ण विश्वाला गुडघे टेकायला लावणाऱ्या कोरोना संकटाला जागतिक आरोग्य संघटनेने साथीचा रोग म्हणुन घोषित केले आहे. अद्यापही कोवीड १९ या आजाराचे सावट पुर्ण राज्यावर आहे.या जीवघेण्या संकटात देखील राज्याची घडी सुरळीत चालावी म्हणुन राज्य सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे  ५०  व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणाऱ्यावर कायद्याने बंधन घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करून आपले बँकेची ही वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्स) किंवा अन्य दृश्य संवाद (oavm) माध्यमातून घ्यावी लागत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोवीड १९ रोगामुळे बँकांना कर्ज खातेस मोरॅटोरिअम पिरियड देणेचे सूचित केले होते त्यानुसार आपण कर्ज खात्यास वसुलीचा मोरॅटोरिअम पिरियड देऊन एन.पी.ए कर्जासाठी तरतूद केलेली आहे.त्याचा लाभ खातेदारांना दिलेला आहे. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांचे बँकेच्या कामकाजात वेळोवेळी विशेष मार्गदर्शन मिळत असल्यामुळे बँक अडचणीच्या परीस्थीतीत देखील प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे बँकेस विविध पुरस्कार मिळत असून सर्व सभासदांनी बँकेत जास्तीत जास्त व्यवहार करावे असे आवाहन केले. यावेळी अहवाल वाचन बँकेचे सर व्यवस्थापक बापूसाहेब घेमुड यांनी केले. सूत्रसंचालन नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन धोंडीराम वक्ते यांनी मानले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राधु कोळपे तसेच बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीराम वक्ते व संचालक मंडळ उपस्थित होते.सभासदांना सभेसाठी सहभागी होता यावे यासाठी बँक व्यवस्थापनाने चांगली सुविधा व नियोजन केल्यामुळे सभेमध्ये  सभासद ऑनलाइन पध्दतीने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Post a Comment

0 Comments