Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक निधीतून कोपरगाव तालुक्यात विविध रस्त्यांच्या कामास प्रारंभ.

        आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक निधीतून कोपरगाव तालुक्यात विविध रस्त्यांच्या कामास प्रारंभ.

    


       

कोपरगाव प्रतिनिधी:---  कोपरगाव तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून या रस्त्यांसाठी निधी प्राप्त झाला असून या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

       कोपरगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. नागरिकांनादळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता याची दखल घेवून या रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी निधी प्राप्त झाला आहे. या रस्त्यांच्या कामांस प्रारंभ करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

                   यामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत १० लक्ष निधीतून मल्हारवाडी ते कोऱ्हाळे हद्द रस्त्याचे खडीकरण,             तसेच स्थानिक विकास निधीअंतर्गत १० लक्ष निधीतून शहाजापूर बस स्थानक ते कोळगाव शिव रस्त्याचे खडीकरण व देर्डे चांदवड येथे सन २०२०-२१ जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत २५ लक्ष निधीतून देर्डे चांदवड ते डाऊच बु. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण आदी कामांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची करावी व ग्रामस्थांनी देखील चांगल्या गुणवत्तेचे रस्ते होतील याकडे लक्ष द्यावे अशा सूचना दिल्या.

                    यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधनेउपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोमसंचालक सुनील शिंदे,आनंदराव चव्हाणसूर्यभान कोळपे, बाबुराव थोरात,रोहिदास होनराहुल रोहमारेराहुल जगधनेप्रभाकर गुंजाळपोलीस पाटील बाबासाहेब गुंजाळ,बाबासाहेब गुंजाळरावसाहेब कोल्हेयुवराज गांगवे,साहेबराव कांडेकरकचरू कांडेकरगोकुळ कांडेकर,आप्पासाहेब शिंदेअनिल गुंजाळज्ञानेश्वर गव्हाणे,गोपीनाथ रहाणेशांतीलाल पवारकिरण पवार,राहुल जगधनेकिसन पाडेकरसरपंच योगिराज देशमुखतुकाराम होनप्रीतम मेहेत्रेकृष्णा शिलेदार,पोपटराव कोल्हेबाबासाहेब देशमुखज्ञानदेव होन,चांगदेव होनपोपटराव गुंडबबनराव होनधर्मा दहे,गुलाबराव कोल्हेजयंत शिलेदारसागर होनसंतोष डुबेपंडित होनबबनराव शिलेदारप्रविण टिळेकर,महेश माळीसोमनाथ भवरराजेंद्र जोशीसमीर वर्पे,गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसेमाजी संचालक सिकंदर पटेलसरपंच सचिन वाबळेउपसरपंच बाळासाहेब ढोमसे सर्व सदस्य भाऊसाहेब वाबळे,शिवाजी वर्पेराहुल जगधनेआंबदास कदमकिरण चंद्रेसार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत  वाकचौरे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशीउपअभियंता उत्तम पवार, ग्रामसेवक सुरेश रहाणे, ग्रामसेविका श्रीमती आरती टोरपे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

            चौकट:- मल्हारवाडी ते कोऱ्हाळे हद्द रस्त्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी निधी देवून त्यांच्या कार्यकाळात हा रस्ता पूर्ण केला. मात्र मागील काही वर्षात या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. दुर्दैवाने मागील पाच वर्षात देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत या रस्त्यासाठी निधी दिला. त्यामुळे माजी आमदार अशोकराव काळे यांच्यानंतर त्यांचे पुत्र आमदार आशुतोष काळे यांच्याकडून आम्हाला न्याय मिळाला आहे – किसनराव पाडेकर

Post a Comment

0 Comments