संचालक म्हणून नाहीतर सेवक म्हणून बॅकेसाठी काम करणार. ------- विवेक कोल्हे.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :-----शेतकऱ्यांचा आर्थीक कणा असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेने आदर्श बॅंक म्हणून नावलौकीक मिळविला आहे. राजकीय जोडे बाजुला ठेवून माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब व स्व.शंकररावजी काळे यांनी बॅंकेचे हीत जपण्याचे काम केले आहे, तीच परंपरा यापुढेही जपण्यास आम्ही कटीबध्द आहोत, संचालक म्हणून नव्हे तर सेवकाच्या भुमिकेतून बॅंकेसाठी काम करणार असल्याची ग्वाही देत नेहमीप्रमाणे 31 मार्चअखेर वसुलीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेकभैया बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
कोपरगाव येथील जिल्हा बॅंकेच्या सभागृहात विविध सोसायटी व शाखांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री कोल्हे बोलत होते. तालुका विकास अधिकारी कैलास गवळी, वसुली अधिकारी ए.आर.लोहकरे, मुख्य कार्यालयाचे शेती कर्ज विभागाचे श्री पवार, सहनिबंधक कार्यालयाचे श्री रहाणे, नोडल अधिकारी एस.ए.शिंदे आदीसह विविध विकास सेवा सोसायटीचे सचिव, शाखाधिकारी, निरीक्षक यावेळी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा बॅंकेचे संचालक पदी निवड झाल्याबददल श्री विवेकभैया कोल्हे कोपरगाव जिल्हा बँक व सचिव संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री कोल्हे म्हणाले, बॅंकींग क्षेत्राचा दीर्घ अनुभव असलेले अध्यक्ष लाभलेले असुन त्यांच्या अनुभवाचा बॅंकेला निश्चित फायदा होणार आहे. या संस्थेवर अनेक शेतक-यांची कुटूंबे अवलंबून आहे. त्यामुळे बॅंकेचे हीत जोपासण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विकास सोसायटी संस्था सक्षम झाल्या तर जिल्हा बॅंक सक्षम होईल. त्यामुळे सोसायटयांनी नफा वाढविण्याच्या दृष्टीने
व्यवसाय निवडावे. जिल्हयामध्ये कोपरगाव तालुक्यातील शाखांची परिस्थिती निश्चितच चांगली आहे. परंतु याहीपेक्षा चांगले काही करता येईल का ? यासाठी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे वसुली करण्यावर भर दयावा. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत सर्वांच्या मदतीने ही संस्था उत्कृष्ठ करण्याचे आपले लक्ष असून बॅंकेची कोपरगाव तालुक्यातील परिस्थिती चांगली असल्याचे जिल्हयाला दाखवुन देण्यासाठी काम करण्याचे आवाहन श्री कोल्हे यांनी केले. तालुका विकास अधिकारी कैलास गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments