कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नावर राजकारण करू नये , अन्यथा जनता येत्या निवडणुकांमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही---संदिप वर्पे.
भाजप आघाडीने नामंजूर केलेल्या २८ कामांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- नगरपालिकेतील कोल्हे गटाच्या बहुमताच्या निर्णयाला जिल्ह्धिकाऱ्यांचा दणका ! कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये भाजप आणि मित्र पक्ष (कोल्हे गट)आघाडीने नामंजूर केलेल्या २८ विविध कामांना नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीच्या ११ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आव्हान दिले होते . त्याची आज अहमनगर येथे सुनवाई झाली त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत भाजप आणि मित्र पक्ष आघाडीचे म्हणणे फेटाळून लावत त्या २८ कामांना १९६५ नगरपालिका कायदा कलम ३०८ नुसार मंजुरी दिली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली .
कोपरगाव नगरपरिषद हि आपल्या विकास कामांपेक्षा तेथील राजकारण आणि राजकारण्यांसाठी अधिक ओळखली जाते. त्यातच जनतेनेही बहुमत एका पक्षास तर नगराध्यक्ष अपक्ष निवडून देऊन या गोंधळात अधिक भर घातली आहे. आणि या विरोभासाचा अंक सतत नगरपालिकेच्या कारभारात दिसत असतो. नगरपरिषदेच्या १६ फेब्रुवारी २०२१ च्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्रमांक ११ च्या मंजुरीच्या बाजूने ११ तर विरोधात १८ मते पडली होती . त्या विरोधात नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि राष्ट्रवादी शिवसेना आघाडीच्या नगरसेवकांनी नगरपरिषद कायदा १९६५ चे कलम ३०९ अन्वये जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे सदर २८ विषय मंजूर करावेत असे अपील केले होते . तर त्याविरोधात भाजप आघाडीने सादर अपील अर्ज वेळेत न केल्याने अर्ज फेटाळण्यात यावे असे म्हटले म्हटले होते . त्यावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी भाजप आघाडीचे म्हणणे फेटाळून लावत वरील २८ विषय मंजूर केल्याचा निकाल दिला . या निकालात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे कि वरील सर्व विषय नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे वेळोवेळी सभा घेऊन सदर कामे आणि त्यांच्या अंदाज पत्रकाची मंजुरी घेऊनच प्रक्रिया राबविले आहे. त्यात सदर कामांना मंजुरी देणे , तांत्रिक मंजुरी देणे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविणे , प्रशासकीय मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया करणे , यानंतर निविदांना अंतिम मंजुरी देताना मात्र अंदाज पत्रके जास्तीचे म्हणत नामंजूर करून पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसानीचे होऊ शकते. त्याच प्रमाणे आर्किटेक्ट फी हि शासकीय नियमानुसार दिलेली आहे. तसेच सर्वात कमी आकारणाऱ्या संस्थेस काम दिल्याने सदरील कामे नाकारण्याचे कारणे योग्य वाटत नसल्याने सर्व कामे मंजूर करीत असल्याचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नावर राजकारण करू नये , अन्यथा जनता येत्या निवडणुकांमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा संदीप वर्पे यांनी यावेळी दिला . वर्पे पुढे म्हणाले कि जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेच्या मानतील निकाल दिला आहे. आम्ही कोपरगावच्या जनतेच्या विकासाची बाजू जिल्हाधिकाऱ्यांना यशस्वी पटवून दिली . तीच बाजू कोल्हे गटालाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ते समजून न घेता केवळ राजकारण करीत बसले . आज जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे मात्र त्यांना तोंडघशी पडावे लागले . अशाच प्रकारे आम्ही जनतेच्या पाणी प्रश्नावर निळवंडेच्या पाइपलाइनला विरोध केला नाही मात्र कोल्हेनी ५ क्रमंकाच्या साठवण तलावाच्या कामास विरोध केला . तसेच या २८ कामांसाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे सतत आग्रही होते . आणि आमचे नेते आमदार आशुतोष काळे यांनी राजकारण बाजूला ठेऊन जनहिताच्या सर्व कामांसाठी वहाडणे यांना कायम पाठिंबा राहील असे जाहीर केले आहे. यावेळी डॉ गर्जे , सुनील गंगुले , धरम बागरेचा, नगरसेविका सपना मोरे , सौ शिलेदार , सौ शिंगाडे , महेमूद सय्यद , राजेंद्र वाकचौरे , आदी उपस्थित होते तर उपस्थितांचे आभार रमेश गवळी यांनी मानले .
0 Comments