आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

मी,मुख्याधिकारी व आ.काळे यांनी प्रयत्न केल्यानेच २ कोटी निधी परत गेलेला नाही याचे भान माजी आमदारांना नाही - विजय वहाडणे


मी,मुख्याधिकारी व आ.काळे यांनी प्रयत्न केल्यानेच २ कोटी निधी परत गेलेला नाही याचे भान माजी आमदारांना नाही
  - विजय वहाडणे
     




कोपरगाव प्रतिनिधी:------" हा निधी परत जाऊ न देता प्रशासकीय इमारत बांधकासाठी वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. मी,मुख्याधिकारी व आ.काळे यांनी प्रयत्न केल्यानेच 2 कोटी निधी परत गेलेला नाही याचे भान माजी आमदारांना नाही.राज्यात भाजपाची सत्ता असतांनाही  भाडेपट्टा करारनामा ,मसूदा करून घ्यायला  तुम्ही नगरपरिषदेला मदत केली नाही.जाणीवपूर्वक "वहाडणे " यांना  श्रेय मिळू नये तुम्ही सहकार्य केलेले नाही  असा हल्लाबोल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,नाट्य रसिकांबद्दल खोटा कळवळा दाखवू नका.तुम्ही बहुमताच्या जोरावर नुकतेच खुले नाट्यगृह नूतनीकरण काम (रू.96 लाख) नामंजूर केलेले आहे.तुम्हाला कोपरगावचे नाट्य कलावंत व रसिक माफ करणार नाहीत.तुमच्या राजकिय नाट्याचा पडदा पडलेला आहे याचे भान ठेवा.नाट्यगृहाचा निधी मी माझ्या घरासाठी वापरणार नसून तुम्ही अर्धवट निधी आणून घाईघाईने कोनशीला लावलेल्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठीच वापरणार आहे.कोपरगावात बंदिस्त नाट्यगृह व्हावे यासाठी मी अनेक वेळा माजी मंत्री विनोद तावडे यांना भेटून निधीची मागणी केली.दि.20 नोव्हेंबर 2017 ला 2कोटी रू. वैशीष्ट्यपूर्ण निधी मंजूर झाला.सर्वे.न.237 मधील 40 आर जागा बंदिस्त नाट्यगृहासाठी मिळावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेने दि17/1/2018 व 10/8/18 ला कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग यांचेकडे केली.दि.5/1/19  ला 237 मधील जागेचा लांबी रुंदी असलेला नकाशा मागणी पत्र भूमी अभिलेख यांना दिले याचबाबत  जानेवारी 2019 मध्ये 3 स्मरणपत्र,साहायक अभियंता गोदावरी डावा कालवा उपविभाग कोपरगाव यांनाही दिले.दि.30/1/19  ला कार्यकारी अभियंता नाशिक यांना पत्र पाठवून भाडेपट्टा करारनामा मसुदा व भाडे आकारणीचा दर देण्याची मागणी केली.दि.18/2/19 सर्वसाधारण सभेत  ठरावही(क्र.20) केला.वारंवार मागणी-पाठपुरावा करूनही करारनामा मसुदा-भाडेपट्टा आकारणी दर उपलब्ध होत नाही म्हणून दि.17/5/19 व दि.16/7/19 रोजी  पत्र देऊन त्यावेळच्या आ.कोल्हे यांना यात लक्ष घालण्यासाठी विनंती केली होती.असेच पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी,अहमदनगर यांना पाठवून सहकार्य करण्याचे सुचविले होते.
दि.24/1/20 व24/6/20 रोजी पुन्हा नाशिक पाटबंधारे विभाग यांना मागणी पत्र दिले,भेटही घेतली.निधी परत जाण्याचा धोकाही सांगितला.आ.आशुतोषजी काळे व पाटबंधारे विभागासोबत झालेल्या बैठकीत सर्वे नं.237 ऐवजी स.नं.1935 व 1939 जागेपैकी एक एकर क क्षेत्रात सुसज्ज नाट्य करावे असा निर्णय झाला.
दि.28/7/20 ला पाटबंधारे विभाग,नाशिक यांनी 30 वर्षाचे भाडे कराराने जागा हस्तांतरण व 5 वर्षाचे जागा आगाऊ भाडेपट्टा बाबत पत्र दिले.प्रती चौ.मी. चार हजार रू.प्रमाणे एकूण रुपये 1कोटी 52 लाख 54 हजार. दि.13/10/20 ला प्रधान सचिव,जलसंपदा विभाग यांना भाडे कमी करून नाममात्र भाडे घ्यावे अशी विनंतीही केली.कारण 25 ते 35 लाख रू. वार्षिक भाडे देणे नगरपरिषदेला आर्थिकदृष्टीने परवडणारे नाही.
अशीच विनंती प्रधान सचिव,नगरविकास यांनाही केली.पण 2017-18 चा मंजूर निधी.31 मार्च आधी खर्च न झाल्यास निधी परत जाण्याचा धोका होता.म्हणून हा मंजूर निधी कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी वळविण्यात यावा असे शासनास कळविले.दि.27/1/21 ला तसे पत्र नगरविकास राज्य मंत्री ना.प्राजक्तजी तनपुरे यांनाही दिले. अहमदनगर येथील बैठकीत मी नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे व प्रधान सचिव श्री.पाठक साहेब यांच्याकडेही" हा निधी परत जाऊ न देता प्रशासकीय इमारत बांधकासाठी वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती असेही ते पत्रकातशेवटी म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments