आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर सुरु – आमदार आशुतोष काळे


एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर सुरु – आमदार आशुतोष काळे

         


कोपरगाव प्रतिनिधी:----  कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांवर योग्य उपचार होवून त्यांची गैरसोय होवू नये यासाठी उद्या (दि.१७) पासून एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात १०० बेडचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात येत असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

             कोरोना बाधित रुग्णांसाठी कोपरगाव येथील एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात मागील वर्षी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. या कोविड केअर सेंटरमध्ये हजारो बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करून हे रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. डिसेंबर-जानेवारी या दोन महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे प्रशासनाकडून हे कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे कोपरगाव तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी लायन्स मूक बधीर विद्यालयात कोविड केअर सेंटर सुरु करून ग्रामीण रुग्णालयात देखील बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. मात्र बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेवून एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

        डिसेंबर-जानेवारी या दोन महिन्यात रुग्णांच्या कमी झालेल्या संख्येवरून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात काही अंशी यश मिळाले होते. मात्र काही दिवसांपासून मागील वर्षीप्रमाणेच पुन्हा कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता कोरोना संकट किती दिवस राहील हे सांगता येणे शक्य नाही. त्यासाठी भविष्यात यदाकदाचित जर रुग्ण संख्या वाढली तर ज्या शाळा महाविद्यालयांकडे वसतीगृह उपलब्ध आहेत त्या शालेय संस्थांनी वसतीगृह उपलब्ध करून देवून कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. सर्व प्रकारचे आवाहन पेलण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना राबविल्या जात आहेत. तरी देखील भविष्यात कोरोणाचा उद्रेक टाळणे हे सर्वस्वी नागरिकांच्या हातात असून वाढती कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments