आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगांव ग्रामीण विकासात संजीवनीच्या विध्यार्थ्यांचा सहभाग-श्री. सुमित कोल्हे.

 कोपरगांव ग्रामीण विकासात संजीवनीच्या विध्यार्थ्यांचा   सहभाग-श्री. सुमित कोल्हे.

  धामोरी येथे राष्ट्रीय  सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचे  उद्घाटन.





कोपरगाव प्रतिनिधी:----- राष्ट्रीय  सेवा योजने अंतर्गत श्रम संस्कारच्या शिबीराच्या माध्यमातुन युवाशक्तीला श्रमसंस्कारा बरोबरच सामाजीक बांधिलकीचे संस्कार मिळतात. यापुर्वीही संजीवनी शैक्षणिक संकुलातील विध्यार्थ्यांचा   कोपरगांव तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्वपुर्ण योगदान राहीलेले आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त  श्री. सुमित कोल्हे यांनी केले.
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमावलीप्रमाणे राष्ट्रीय  सेवा योजना उपक्रमांतर्गत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संजीवनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि संजीवनी औषधनिर्माणशास्त्र महाद्यिालय यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ भारत अभियान, सक्षम युवा समर्थ भारत अभियान आणि एक भारत श्रेष्ठ  भारत या तिन्ही उपक्रमांतर्गत आयोजीत विशेष  श्रम संस्कार शिबीर धामोरी येथे आयोजीत करण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी श्री. सुमित कोल्हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. सदर प्रसंगी  सहकार महर्षि  श्री. शंकरराव  कोल्हे सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष श्री. कैलास माळी, धामोरी गावचे सरपंच श्री. नारायण भाकरे, ग्रामसेवक श्री फुलसिंग तडवी, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. ए.जी. ठाकुर, संजीवनी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. के. एस. साळुंखे, संजीवनी सिनिअर काॅलेजचे प्राचार्य डाॅ. एस.बी. दहिकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. नागोराव सुरनर, प्रा. शशिकांत  होन व प्रा. अजिंक्य कुऱ्हे , विध्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश  भांड, ऋषिकेश  आघाव, यश  रसाळ, आदी उपस्थित होते. या श्रमसंस्कार शिबिरात २००  महाविद्यालयीन मुला मुलींचा सहभाग आहे.
श्री. कोल्हे पुढे म्हणाले की दरवर्षीच्या  श्रमसंस्कार शिबीरातुन ग्रामस्वच्छता, वृक्षारोपन, जल है तो कल है, मुली व महिलांच्या रक्तामधिल हिमाग्लोबीनची व रक्त गटाची तपासणी, आहाराविषयी मार्गदर्शन, आदी उपक्रमांची अंमलबजावणी करून ग्रामविकासाला चालना दिली आहे. मागील एका श्रमसंस्कार शिबीरात शेतकऱ्यांच्या  अर्थकारणाला चालना देण्यासाठी तालुक्यातील ब्राम्हणगाव आणि पंचक्रोशितील लोकांमध्ये जागृती करून तेथिल अनेक वर्षांपासून  बंद पडलेला आठवडा बाजार सुरू केला असे सांगुन कोल्हे पुढे म्हणाले की या देशात ६० टक्यांपेक्षा अधिक तरूणांची संख्या आहे. या वर्गाला ग्रामीण भागातील लोकांच्या व्यथा समजणे गरजेचे आहे. यासाठी अशा  प्रकारच्या श्रमसंस्कार शिबीराने निश्चितच  सामाजीक बांधिलकीचे बीजे तरूणामध्ये रूजल्या जातील. माजी मंत्री श्री. शंकरराव  कोल्हे यांनी ग्रामिण जनजीवन सुधारण्यासाठी आपले संपुर्ण  आयुष्य  घालविले. त्यांच्या संस्कारातुन आणि मार्गदर्शनातून  आज संजीवनी शैक्षणिक संकुल वाटचाल करीत आहे. संजीवनीच्या विविध व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये शिकत असलेल्या ग्रामणि भागातील विध्यार्थांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन देवुन संजीवनीने ग्रामीण जीवनाशी  अनोखे नाते जपले आहे. व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाच्या प्रभावानुसार त्याला या महाकाय जगतात मान-सन्मान मिळत असतो, तसेच स्वतःच्या ज्ञानाबरोबरच व्यक्तीमत्वाच्या पैलुंनुसार अर्थार्जन प्राप्त करता येते. ग्रामिण जीवन काय असते, याचा हेतुपुरस्कर अभ्यास करण्याची ही संधी आहे. आपण स्वतःचा उत्कर्षां  बरोबरच समाजाचे काही देणे लागतो हा विचार प्रत्येकाने रूजवावा. यातुन समाजाकडून आपला नेहमी आदर होईल, असे श्री कोल्हे शेवटी म्हणाले.
         कर्यक्रमाचे सुत्रसंचलन विध्यार्थी समाधान ढगे व हुमेरा शेख  यांनी केले तर आभार संकेत बावके याने मानले.
    

Post a Comment

0 Comments