आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

ट्रक चालकास मारहाण करून २६ लाखांच्या दारू ची लूट केल्याप्रकरणी तालुक्यातील चौघांवर गुन्हा दाखल आरोपी पसार, झगडे फाटा चांदेकसारे शिवारातील घटना.

 ट्रक चालकास मारहाण करून २६ लाखांच्या दारू ची लूट केल्याप्रकरणी तालुक्यातील चौघांवर गुन्हा दाखल

 आरोपी पसार, झगडे फाटा चांदेकसारे शिवारातील घटना.
कोपरगाव प्रतिनिधी:---
तालुक्यातील महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या चांदेकसारा- झगडे फाटा शिवारात २५ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास ट्रक चालकास मारहाण करून सुमारे २६लाख४९हजार७४१रु. लूट करून आरोपी पसार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील झगडे फाटा चांदे कसरा शिवारात दारूने भरलेले ट्रक येत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेले आरोपी १)योगेश कैलास खरात राहणार भोजडे चौकी,२) संतोष गौतम खरात राहणार भोजडे चौकी ३) धनंजय प्रकाश काळे राहणार रामवाडी सवंत्सर व एक अनोळखी इसम या आरोपींनी तो ट्रक अडवून चालकास बेदम मारहाण केली व १) ५१५००/-रुपये किमतीची भिंगरी संत्रा कंपनीचे ७५० मिली मापाच्या प्रत्येक बॉक्स मध्ये १२ वाटल्या असलेले १०० बॉक्स ज्याचा बॅच नंबर १९९७ असा असलेले २)५५४५००/-रुपये किमतीचे भिंगरी संत्रा कंपनीचे १८० मिली मापाच्या प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटली असलेले ९५० बॉक्स ज्याचा बॅच नंबर दोन हजार असलेले ३)१३५०००/- रुपये किमतीचे भिंगरी संत्रा कंपनीचे ९० मिली मापाच्या प्रत्येक बॉक्स मध्ये १०० बाटल्या असलेले २०० बॉक्स ज्याचा बॅच नंबर २००१ आसलेले 

एकूण रुपये  ७२८०००/-सह v a tax ८,१६,९२५ एक्साईज ड्युटी ११,०४,८१६ असे मिळून 

एकूण  २६,४९,७४१रुपये ची लूट करून पसार झाले आहे याबाबत शरद गोपीनाथ वरगुडे यांच्या फिर्यादीवरून वरील चार आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर-|७६/२१ भा.द.वि. कलम.३९०, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे एकंदरीत या लुटीमुळे शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पसार झालेल्या आरोपींना पकडण्याचे तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्यासह पोलिसांवर मोठे आव्हान आहे

Post a Comment

0 Comments