आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आत्मा मलिक रुग्णालय प्रशासनाचा प्रताप; कोरोनो बाधित मृतदेह दिला उघड्यावर ताब्यात ; गुन्हा दाखल.


 आत्मा मलिक रुग्णालय प्रशासनाचा प्रताप; कोरोनो बाधित मृतदेह दिला उघड्यावर ताब्यात ; गुन्हा दाखल.
कोपरगाव प्रतिनिधी :-----  कोकमठाण येथील आत्मा मलिक रुग्णालयाने काल कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यू नंतर मृतदेह प्लास्टिक आवरणात न गुंडाळता तसाच नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोना रुग्णाबाबत आणि त्या रुग्णाचा मृत्यूनंतरही निष्काळजीपणा दाखविल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि आत्मा मलिक आश्रम कोकमठाण द्वारा संचालित आत्मा मलिक रुग्णालयात आश्रमातील एक संत कोरोनावर उपचार घेत होते . उपचारादरम्यान काल दिनांक १८ मार्च रोजी सदर महाराजांचे निधन झाले . त्यांचा मृतदेह नातलग तसेच अनुयायांच्या ताब्यात देताना कोरोनाबाधित मृत व्यक्तीबाबत शासनाने आखून दिलेले सर्व नियम पायदळी तुडविले . मृतदेह निर्जंतुक करून प्लॅस्टिकच्या आवरणात गुंडाळून देणे आवश्यक असताना रुग्णालय प्रशासनाने मृतदेह तसाच नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यानंतरही हा प्रकार एव्हढ्यावरच थांबला नाही . मयत व्यक्ती दीक्षांत साधू असल्याचे कारण सांगत त्यांच्यावर दहन संस्कार न करता त्यांना समाधी देणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांचा मृतदेह आहे त्या स्थितीत अनुयायांनी ताब्यात घेतला . याबाबतची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून संबंधितांना समज दिली . आणि मृतदेहाचे दहन करण्यात आले. या दरम्यान अंत्यसंस्कारासाठी केवळ वीस लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असताना शेकडोचा जनसमुदाय हजर होता . यामुळे तहसीलदार चंद्रे यांनी संबंधितांना कारवाईचे आदेश दिले होते . त्याप्रमाणे कोकमठाणचे ग्रामसेवकांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आत्मा मलिक रुग्णालय व्यवस्थापन व संबंधित डॉक्टर तसेच अंत्यविधीस उपस्थित असलेल्या समुदायावर साथ रोग प्रतिबंधक कायदयानुसार कलम १८८. २६९,२७०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्मा मलिक रुग्णालय यापूर्वीही अनेक वेळा विविध कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सदर रुग्णालय हे आपल्या उपचारांपेक्षा वरील प्रकारामुळेच अधिक चर्चेत असते . याअगोदर पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यावर उपचार करताना केलेला हलगर्जीपणा असेल किंवा रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारणी असेल .अशा अनेक कारणामुळे आत्मा मलिक रुग्णालय वादाचा केंद्र बिंदू ठरत आहे. असे असतानाही रुग्ण या रुग्णालयात येतात ते केवळ आत्मा मलिक आश्रम आणि त्यावर असलेल्या श्रद्धेमुळे . मात्र असे काही प्रसंग उद्भवल्यास आश्रम प्रशासनाकडून रुग्णालय खाजगी संस्थेस चालवण्यास दिल्याचे सांगून आपले हात वर करून मोकळे होते. परंतु खाजगी संस्थेच्या प्रतापामुळे आश्रमाच्या प्रति भक्तीभाव असलेल्या सर्वसामान्यांच्या भावनेचाच खेळ होत आहे.

Post a Comment

0 Comments