Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

पंचायत समिती फर्निचरसाठी निधी द्या आ. आशुतोष काळेंची ग्रामविकासमंत्र्यांकडे मागणी

 

पंचायत समिती फर्निचरसाठी निधी द्या

आ. आशुतोष काळेंची ग्रामविकासमंत्र्यांकडे मागणी

     


 

कोपरगाव प्रतिनिधी:---  कोपरगाव पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीचे विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या इमारतीच्या फर्निचरसाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

           शासकीय कार्यालयात नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात पंचायत समितीच्या इमारतीसाठी निधी मंजूर करून आणला होता. या निधीतून पंचायत समितीच्या इमारतीच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून काही दिवसात काम पूर्ण होवून प्रशासकीय कामासाठी हि इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. पंचायत समितीच्या इमारतीच्या विस्तारीकरणाचे काम झाल्यामुळे बांधण्यात आलेल्या नूतन सभागृहासाठी व इतर कार्यालयांसाठी फर्निचर करणे आवश्यक आहे. या इमारतींच्या इलेक्ट्रिक कामासाठी निधी मंजूर आहे. मात्र फर्निचरसाठी निधी देण्यात आलेला नाही. याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.१७) रोजी मंत्रालयात जावून ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांची भेट घेवून पंचायत समिती कार्यालयाच्या फर्निचरसाठी निधी मिळावा अशी मागणी केली.

         पंचायत समिती कार्यालायचे विस्तारीकरण काम पूर्ण होत आले आहे. या विस्तारीकरणाच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी आणून अद्यावत सुविधांनी युक्त पंचायत समिती कार्यालय साकारले जाणार आहे. या विस्तारीकरणाच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही याची दक्षता घेवून आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातूनमहाविकास आघाडी सरकारच्या ग्रामविकास विभागाने कोपरगाव पंचायत समितीला ७०.०० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीमध्ये फर्निचर करावे लागणार आहे. ग्रामीण भागातील नागरिक विविध कामानिमित्त पंचायत समिती कार्यालयात येत असतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करतांना अडचणी येवू नये व नागरिकांची कामे लवकरात लवकर होवून नागरिकांना व कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पंचायत समितीच्या इमारतीमध्ये अद्यावत फर्निचर करणे गरजेचे आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या फर्निचरसाठी जास्तीत जास्त निधी ग्रामविकास खात्याकडून मिळावा   अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. मागील आठवड्यात आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयाच्या फर्निचरसाठी महसूल खात्याकडून १९३.४९ लाखरुपये निधी मंजूर करून आणला आहे. व आता पंचायत समितीच्या फर्निचरसाठी   निधी मिळावा यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु केला आहे. तहसील कार्यालय व पंचायत समिती या दोनही कार्यालयात विविध कामानिमित्त नागरिकांची नियमित वर्दळ असते. ज्याप्रमाणे तहसील कार्यालयाच्या फर्निचरसाठी निधी मिळविला त्याप्रमाणे पंचायत समिती फर्निचरसाठी देखील निधी आणून या दोनही इमारतीमध्ये नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील यासाठी आमदार आशुतोष काळे प्रयत्नशील आहेत

Post a Comment

0 Comments