आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

तहसील कार्यालय फर्निचरसाठी १९३.४९ लाख निधी उपलब्ध - आमदार आशुतोष काळे

                   तहसील कार्यालय फर्निचरसाठी १९३.४९ लाख निधी उपलब्ध - आमदार आशुतोष काळे

    



कोपरगाव प्रतिनिधी :---   कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना फर्निचर अभावी येत असलेल्या अडचणींची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाकडे फर्निचरसाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावास महाविकास आघाडी शासनाच्या महसूल विभागाने मान्यता देऊन १९३.४९ लाख (अक्षरी- एक कोटी त्र्यान्नव लक्ष एकोणपन्नास हजार) रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

                        माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील अनेक शासकीय इमारतींची कामे मार्गी लावली. या शासकीय इमारतींनी कोपरगाव शहराच्या वैभवात भर घातली व त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. त्या शासकीय इमारतींपैकी अत्यंत महत्वाची असलेली एक इमारत तहसील कार्यालयाची होती. मागील काही वर्षापूर्वी या इमारतीचे लोकार्पण करण्यात येऊन या इमारतींमध्ये आजही प्रत्यक्षात प्रशासकीय काम सुरु आहे. मात्र इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर देखील फर्निचरची उपलब्धता होऊ शकली नाही त्यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांना काम करतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. व त्याचा परिणाम पर्यायाने तालुक्यातील नागरिकाच्या तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या विभागांशी असलेल्या कामावर होत होता. तहसील कार्यालयात फर्निचर नसल्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होते. त्यावेळी आमदार नसतांना देखील आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांची होत असलेली अडचण लक्षात घेवून तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाकडे उपब्ध करून दिलेली आहे. मात्र तालुक्याचा आत्मा असलेल्या तहसील कार्यालयाच्या एवढ्या मोठ्या वास्तूला फर्निचरची उणीव जाणवत होती. त्यामुळे नागरिकांची  होत असलेली गैरसोय व प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करतांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयाच्याफर्निचरसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळाले आहे.

             कोरोनाच्या संकटात फर्निचरसाठी मोठ्याप्रमाणात निधी मंजूर झाल्यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडचणी दूर होणार आहे. मिळालेल्या निधीतून तहसील कार्यालयाच्या इमारतीचे सुशोभिकरण होवून तालुक्यातील नागरिकांना अद्यावत सोयी-सुविधा मिळणार असून तालुक्यातील नागरिकांचे कामे लवकरात लवकर होण्यासाठी निश्चितपणे मदत होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments