सर्वांनाच लस उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील.
आमदार आशुतोष काळे
सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझर
नियमितपणे वापर करा.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----- मागील काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात वाढत असलेली कोरोना बाधित रुग्णांची संख्या काळजी वाढविणारी आहे. सर्वच नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी अवधी लागणार आहे. लसीकरण झाल्यानंतर त्याचे परिणाम निश्चितपणे चांगले दिसतील याची मला अशा आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांना खबरदारी घ्यावीच लागेल त्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवून मास्क व सॅनिटायझरचा नियमितपणे वापर करावा असे आव्हान आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोरोना परिस्थिती बाबत आढावा घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात आरोग्य, महसूल, पोलिस,शिक्षण, नगरपालिका आदी विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, श्रावण आसने, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, आरोग्य अधिकारी समन्वयक डॉ. सौ. वैशाली बडदे, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दौलतराव जाधव, शहराचे पोलीस अधीक्षक वासुदेव देसले, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. महेंद्र गोंधळी, निमा अध्यक्ष डॉ. तुषार गलांडे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. अजय गर्जे, डॉ. आतिष काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक संदीप पगारे,राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद,फकिरमामु कुरेशी, दिनकर खरे, राहुल जगधने,सुधाकर होन आदी उपस्थित होते. आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जावू शकते. त्यामुळे सर्वांनाच शासनाच्या कडक निर्बंधांना सामोरे जावे लागेल. पोलीस प्रशासनाच्या धाकामुळे नव्हे तर आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य अबाधित राहील यासाठी मास्क वापरा व शासनाचे नियम पाळा. जेष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शासकीय कार्यालयांवर अतिरिक्त ताण असला तरी नागरिकांना सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा द्यावी. तसेच शहरातील ज्या भागात किंवा तालुक्यातील ज्या गावात जास्त रुग्णसंख्या वाढत आहे त्या गावच्या प्रशासनाने योग्य ती काळजी घेणे गरजेचे प्रयत्न करावे. आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव करण्याचे हे आपल्याच हातात असून तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी कोरोना आढावा बैठकीत नागरिकांना केले
0 Comments