आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात आत्मिक समाधानाची अनुभूती – आमदार आशुतोष काळे

 प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात आत्मिक समाधानाची अनुभूती

– आमदार आशुतोष काळे

   


कोपरगाव प्रतिनिधी:------ धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्यासाठी एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे. हि एकाग्रता प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पवित्र वातावरणात आल्यावर मिळते त्याच बरोबर येथे आल्यावर आत्मिक समाधानाची अनुभूती देखील येते असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

          महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवमहात्म्य कथा व झेंडावंदन आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते न करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, परमेश्वराची आराधना केल्यानंतर प्रत्येक मनुष्याला मोठे समाधान मिळत असते. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण परमेश्वराची आराधना करून मनाला प्रफुल्लीत करतो. मन प्रफुल्लीत होवून एक वेगळी उर्जा निर्माण होते. प्रत्येकाला आपले दैनंदिन काम करण्यासाठी या उर्जेची मोठी मदत होत असते. हीच उर्जा प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पवित्र वातावरणात भरलेली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांना तालुक्यातच उपचार मिळावे यासाठी कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. मात्र वाढत असलेली बाधित रुग्णांची संख्या चिंता वाढविणारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेवून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

       यावेळी ब्रह्माकुमारी सरलादीदीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूलेनगरसेवक मंदार पहाडेसंदीप पगारेअजीज शेखहाजी मेहमूद सय्यदडॉ. रामदास आव्हाडडॉ. नाईकवाडे,वृंदाताई कोऱ्हाळकरफकीरमामु कुरेशीअशोक आव्हाटेमनोज कडूजावेद शेखचंद्रशेखर म्हस्के,वाल्मीक लहिरेनिखिल डांगेयोगेश नरोडे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments