आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी अकॅडमीमध्ये मराठी गौरव दिन उत्साहात साजरा

 संजीवनी अकॅडमीमध्ये मराठी गौरव दिन उत्साहात साजरा

                                                                                मराठीच्या अभ्याासिका प्रा. शिला गाडेे व कवी राम थोरे यांचेकडून विध्यार्थ्यांचे  कौतुक.

कोपरगांव प्रतिनिधी:----- दरवर्षी  प्रमाणे संजीवनी अकॅडमी मध्ये मराठी गौरव दिन मोठ्याा उत्साहात साजरा करण्यात आला. कवी कुसूमाग्रजांचा जन्म दिन २७ फेब्रुवारी हा मराठी गौरव दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाची सुरूवात मराठी स्वागत गीताने झाली तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, मराठी भाषेच्या  गाढ्या  अभ्यासिका प्रा. शिला गाडे व प्रसिध्द कवी श्री. राम थोरे यांचे हस्ते सरस्वती पुजन आणि दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम उपस्थित होत्या.  
या प्रसंगी प्रा. गाडे म्हणाल्या की मराठी भाषेच्या  अनेक उपभाषा  आहेत व या द्वारे मराठी भाषा  जतन केली जात आहे. मराठी भाषेचा  दैनंदिन जीवनात जाणिवपुर्वक उपयोग करून तिचे संवर्धन करणे आवश्यक  आहे. आपणच आपल्या भाषेचा  अभिमान ठेवणे गरजेचे आहे. कवी श्री राम थोरे यांनी विध्यार्थ्यांनी  सादर केलेल्या कवितांचे व भाषणांचे कौतुक केले. त्यांच्या  काही निवडक कवितांचे वाचन करून ते म्हणाले की मातृभाषेचे  ज्ञान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. 
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी  कविता वाचन, पोवाडे व भाषणे  सादर केली. निलांबरी अमरिश  मेमाणे, स्नेहा अविनाश  जाधव यांनी मराठी भाषेची  महती दिली. परीमल आदिक याने निवडक चित्रपटातील संवाद सादर केले. ज्ञानेश्वरी  हेमंत आव्हाड हिने कुसूमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. तसेच आदिती सुर्यभान कोळपे, श्रेया संदिप शिंदे , श्रावणी आण्णासाहेब थोरात व स्वरा अजित कोकाटे यांनी मराठी कविता सादर केल्या. श्वेता  विजय मोरे हिने मराठी भाषेचा  दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा  वापर कसा करावा या बाबत आवाहन केले.  
मराठी दिना निमित्ताने निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात विजयी विध्यार्थ्यांना  प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यामध्ये इ. ५ वीच्या वैदेही किरण सोनवणे, स्नेहा अविनाश  जाधव, अनुष्का शशिकांत शिंदे , सई जयंत पोचाळ, इ. ६ वीच्या सृष्टी  रूपेश  पारख, आरूशी मधुकर आहेर, श्रृती गांगुर्डे व इ. ७ वीच्या आरती अनिल कारवा, सई विकास खालकर, मनस्वी राजेश  परजणे व प्राप्ती दिपक बुधवंत यांचा समावेश  होता. 

                                            

Post a Comment

0 Comments