बुलेट ट्रेनसाठी अधिग्रहीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला जास्तीत जास्त मोबदला मिळवून देवू
- आमदार आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:---- समृद्धी महामार्गाच्या लगत मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन जाणार आहे. शासनाकडून कोपरगाव तालुक्यात बुलेट ट्रेनसाठी अधिग्रहीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला जास्तीत जास्त मोबदला मिळवून देवू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी बुलेट ट्रेनसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत अशा संभाव्य शेतकऱ्यांना दिली.
समृद्धी महामार्गाच्या लगत मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन जाणार आहे. त्यासाठी नव्याने जमीन अधिग्रहीत कराव्या लागणार आहे. यापूर्वीही समृद्धी महामार्गासाठी कोपरगाव तालुक्यात शासनाने मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहीत केल्या असून आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गासाठी घेण्यात आल्या आहेत त्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळाली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गालगत बुलेट ट्रेन नेण्याच्या प्रकल्पाला शेतकऱ्यांच्या जमीनी अधिग्रहीत करण्यात येणार असून या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांची भेट घेतली होती. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव येथे गौतम बँकेच्या सभागृहात शेतकरी व बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सर्वेक्षण करणाऱ्या टुला कंपनीच्या अधिकाऱ्यांची व सदर प्रकल्पात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी प्रस्तावित मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन कोपरगाव तालुक्यातून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून जाणार आहे त्या शेतकऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. सदरची बुलेट ट्रेन समृद्धी महामार्गाच्या दक्षिण बाजूने जाणार आहे. बुलेट ट्रेनच्या ट्रॅकसाठी (रेल्वे लाईनसाठी) समृद्धी महामार्गालगत १७.५ मिटर जागा अधिग्रहीत केली जाणार आहे. यामध्ये जवळपास १२०० शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे. समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून दिला आहे. त्याप्रमाणेच बुलेट ट्रेनसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणार आहेत त्या शेतकऱ्यांना देखील जास्तीत जास्त मोबदला मिळवून देऊ असे आश्वासन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
यावेळी टुला सर्वेक्षण कंपनीचे जाधव,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, बाळासाहेब रोहमारे,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर, दिलीपराव बोरनारे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,देवेन रोहमारे, सुधाकर होन, सुनील होन, शंकर गुरसळ, बंकटराव जगताप, कृष्णा शिलेदार, राजेंद्र निकम, भास्कर होन आदींसह शेतकरी
0 Comments