अज्ञात चोरट्यांनी गाठली परिसिमा चोरुन नेले दोन बोकड व शेळी.
जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, गुन्हा दाखल.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----- तालुक्यातील देरडे-कोराहले या ठिकाणी राहणाऱ्या राजेंद्र भिमराव डुबे यांच्या वस्तीवरून रविवार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लाल रंगाच्या गाडीमध्ये येऊन राजेन्द्र डुबे यांच्या वस्तीवरील दोन बोकड व एक शेळी चोरून नेल्याची घटना घडली विशेष म्हणजे सकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गाडीत घालून दोन बोकड व शेळी असा दहा हजार रुपये किमतीचे ऐवज चोरून नेल्याने जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आल्याचे या घटनेवरून दिसत आहे सध्या आता कडक उन्हाची सुरुवात सुरू झाले असून जनावरांना माळरानावर चरण्यासाठी अनेक शेतकरी बांधव घेऊन जातात अशा परिस्थितीत आता जनावरांवर जास्त लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. वरील घडलेल्या घटनेच्या विरोधात राजेंद्र डुबे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाणे मध्ये तीन अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर|७४/२०२१ भा.द.वि. कलम.-३७९, ४३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पो.हे.काॅ.ए.व्ही. गवसणे हे करत आहे.
0 Comments