सत्तेचा दुरुपयोग करत 24 तास पाणी वापरणाऱ्यांची नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांनी केली पत्रकार परिषदेत नावे जाहीर.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---एकीकडे कोपरगाव शहरातील जनतेला आठ दिवसाआड पाणी तर गेली अनेक वर्षे सत्तेचा दुरुपयोग करून पालिकेतील अधिकाऱ्यांना दमबाजी करून 24 तास पाणी घेणारेच म्हणतात की शहरातील जनतेला आठ दिवसात पाणी का 24 तास पाणी घेणाऱ्यांची नावे नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी मंगळवार 23 मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली ती खालील प्रमाणे.
मेन लाईनवर 24 तास पाणी(17)
1)समता पतसंस्था
2)विजयकुमार प्रेमराज काले
3)राजेंद्र झावरे (फक्त राजेंद्रजी झावरे हेच एकमेव असे आहेत कि ज्यांनी 17/4/2012 ला स्वतःचे मेन लाईनवरील नळजोड काढून टाका असे पत्र दिलेले आहे)
4) एस. टी. डेपो
5)तालुका विकास मंडळ
6)बाळकृष्ण सारंगधर
7) विठ्ठल क्षत्रिय
8)बद्रीनाथ चावला
9) राजेंद्र बा.वाणी
10)माजी सैनिक कार्यालय
11)संजय बोऱ्हाडे
12)अरुण वाणी
13)कल्याण गंगवाल
14)के.बी.पी.विद्यालय
15)शिलेदार साहेबराव
16)कोपरगाव वि.सो. पेट्रोल पंप
17)बोरावके मोटेल्स
12 तासापेक्षा जास्त (48)
1)बाबासाहेब गाडे
2)शिवाजी आनंदराव संधान
3)राहुल रोहमारे(संधान)
4)केशव भवर
5)जानकीदेवी पडियार
6)केशवराव साबळे
7)नानासाहेब चांदगुडे
24 तास (14)
1)कमलिनी सातभाई वाचनालय
2)दिलीपराव वाघ
3)गुलाब अगरवाल
4) वायखिंडे
5)माधव जोशी
6)रविंद्र पाटील
7)द्वारकानाथ व्यास
8)विठ्ठल आदमाणे
9)सेवा निकेतन
10)होली फॅमिली चर्च
11)अंबादास साळुंके
12)वर्धमान पांडे
8 तास पाणी वापरणारे संजयजी सातभाईंसारखे अनेकजण आहेत
नगरपरिषदेतील सत्तेचा गैरवापर करून प्रचंड पाणी वापरणारेच विचारतात कि पाणी का कमी पडते. थोडीफार नैतिकता असेल तर बेसुमार पाणी वापरणाऱ्यानी किमान 10 पट तरी पाणीपट्टी भरली पाहिजे.
जास्त पाणी वापरणाऱ्यांचा पाणी पुरवठा 1 ते दिड तासांवर आणण्याचे काम सुरू झालेले आहे.हे काम दोन महिन्यात पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे.अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये.शहरवासीयांना पाणी कुणामुळे कमी पडते हे यावरून समजू शकते.कर्मचाऱ्यांना हाताशी धरून,अधिकाऱ्यांवर दबाव आणून वर्षानुवर्षे मनमानी करणारे अजूनही भानावर नाहीत.त्यांना भानावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.शहर विकास व्हावा यासाठी नेत्यांनी अशा प्रवृत्तीना पाठिशी घालू नये.
बस स्टँडसमोर चंदुलाल दिपचंद काले यांच्या भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बेसमेन्ट पार्किंगच्या जागेत व्यावसायिक गाळे बांधून विकले व प्रचंड पैसा कमविला.गाळेधारक व ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत असल्याने रहदारीला कायमस्वरूपी अडथळा निर्माण झाला आहे.ते काढण्याबाबत त्यांना नगरपरिषदेने नोटिसही दिलेली आहे.
निलेश भालेराव यांनी छ. शिवाजी महाराज संकुल येथे घेतलेल्या दुकान गाळ्याचे भाडे तर थकवलेच पण आजपर्यंत डिपॉझिटही भरलेले नाही,एकूण बाकी सव्वा दोन लाख रू. आहे.या गाळ्याचे खरे मालक कोण आहेत हे आदरणीय कैलास जाधवच सांगू शकतील.दुसऱ्याचे नावावर गाळा घेऊन, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणून फुकट गाळा वापरण्याचा धंदा बिनबोभाट सुरू आहे.त्यामुळे नगरपरिषदेचे उत्पन्न बुडून शहर विकासाला पैसा कमी पडतो. वादग्रस्त सर्विसस्टेशन प्रकरण फेटाळून न्यायालयाने जाधव यांना पाच हजार रू.कोर्ट खर्च भरण्याचा आदेश पूर्वीच दिलेला आहे. उच्च न्यायालयाने ही यांचा दावा फेटाळला आहे.जाधव यांनी सर्व्हिस स्टेशन खरेदीची कागदपत्रे दाखविली तर बरे होईल.यानंतर हातगाड्यावर व्यवसाय करणाऱ्याकडून हप्ते उकळणाऱ्याची नावेही लवकरच उघड होणार आहेत.
प्रचंड थकबाकी असलेले गाळेधारकांना नोटिसा दिल्या आहेत.वसुली व गाळे सील करण्याची कारवाईही सुरू झालेली आहे. असेही शेवटी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे शेवटी म्हणाले
1 Comments
चला असेच सर्व नावे बाहेर काढा आणी कारवाई करा
ReplyDelete