माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी उदयोग समुहाच्या वतीने सभासद व कामगारांना मोफत कोविड 19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सभासद व कामगारांना मोफत कोविड 19 चे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ युवानेते, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विवेकभैया बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते करण्यात आला.
देशासह राज्यभरात कोरोना विपाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात कोविड 19 लसीकरणाची मोहिम सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या या लसीकरणासाठी संजीवनी उदयोग समुहाने पुढाकार घेतला असुन सभासद व कामगारांना मोफत लस देण्यास सुरूवात केली आहे. तालुक्यातील आत्मा मालिक हाॅस्पीटल व संत जनार्दन स्वामी हाॅस्पीटल या ठिकाणी सभासद व कामगारांना ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी कारखाना कार्यस्थळावरून बसद्वारे उपरोक्त रूग्णालय येथे सभासद व कामगार यांना घेउन जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज विवेकभैया कोल्हे यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन आप्पासाहेब दवंगे, संचालक संजय होन, प्र.कार्यकारी संचालक आर के सुर्यवंशी, सेक्रेटरी टी आर कानवडे, कामगार संघटनेचे मनोहर शिंदे, लेखाधिकारी एस एन पवार आदी उपस्थित होते.
सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या संजीवनी उदयोग समुहाने गेल्या वर्षभरापासून कोविड 19 या आजारापासून सरंक्षण करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहे. कोपरगाव शहरात औषध फवारणी, मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप, नगरपालिका कर्मचा-यांना सरंक्षक किट तसेच सभासद व कामगारांना मोफत मास्क,सॅनिटायझर वाटप केलेले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रूग्णांसाठी दररोज जेवणाची व्यवस्था करून रूग्णांसाठी वाफेचे मशीन आदी साहित्याचा पुरवठा केला आहे. सध्या कोरोना आजाराने पुन्हा डोके वर काढले असुन दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संजीवनी उदयोग समुहाच्या वतीने कारखान्याचे अविभाज्य असलेले घटक सभासद व कामगारांना कोविड 19 ही लस मोफत उपलब्ध करून दिली आहे. सध्या कोरोना आजाराचे प्रमाण वाढत असल्याने नागरीकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून मास्क,सॅनिटायझर वापरावे. तसेच सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन यावेळी श्री विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
0 Comments