आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

क्रीडा क्षेत्रात आमदारांनी राजकारण आणु नये - श्री. सुमित कोल्हे

 क्रीडा  क्षेत्रात आमदारांनी राजकारण आणु नये   - श्री. सुमित कोल्हे

     

कोपरगाव प्रतिनिधी :-----  तालुक्यातील खेळाडूंच्या सोयीसाठी सर्वांनी एकत्र येवुन काम करणे गरजेचे
कोपरगांव: माजी मंत्री श्री शंकरराव  कोल्हे हे कोपरगांव तालुक्यातील खेळाडूंना सुविधा निर्माण होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील  राहीले. सन २००३-२००४ मध्ये कोपरगांव तालुक्यासाठी त्यांच्या प्रयत्नांमुळे तालुका क्रीडा संकुल मंजुर झाले. परंतु कोपरगांव शहरात किंवा जवळ पुरेशी  जागा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी स्वतःच्या अधिपत्याखालील संस्थांची ६ एकर जागा सध्याच्या क्रीडा संकुलासाठी विनामुल्य उपलब्ध करून दिली. मात्र याची जाणिव न ठेवता विद्यमान आमदार हे क्रीडा क्षेत्रात राजकारण आणु पाहत आहे, असे मत संजीवनी फाऊंडेशनचे सचिव व युवा नेते श्री सुमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. 
       विद्यमान आमदार यांनी नुकत्याच एका क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस वितरणात बोलताना सांगीतले की सध्याचे  तालुका क्रीडा संकुल शहराच्या  बाहेर आहे त्यामुळे शहरालगत उपसंकुल उभारण्याच्या प्रयत्नात आहोत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री सुमित कोल्हे म्हणाले की सर्वांनीच मागील पाठपुराव्याची व सत्य परीस्थितीची माहिती घेणे गरजेचे आहे. ज्या जागा भविष्यातील  उपसंकुलासाठी आमदार सांगत आहे, त्या जागा तांत्रिक अडचणी व पुरेशा नसल्यानेच व शहरालगत कोणी जागा देण्यास तयार नसल्या कारणाने माजी मंत्री श्री. शंकरराव  कोल्हे यांनी स्वतःच्या अधिपत्याखालील संजीवनी कृषी , शैक्षणिक  व ग्रामिण विकास संस्था या संस्थेची  ३ एकर ३६ गुंठे जागा उपलब्ध करून दिली. मात्र या जागेत ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक व्यवस्थित बसत नसल्याने संजीवनी ग्रामीण शिक्षण  संस्थेने २ एकर क्षेत्र क्रीडा संकुलासाठी दिले.  अशी  एकुण सुमारे ६ एकर जागा दिली. एवढेच नव्हे तर शासनाने  दिलेल्या रू २५ लाख निधित अपेक्षित क्रीडा संकुलाचे काम पुर्ण होत नाही असे लक्षात येताच संजीवनी ग्रामिण  शिक्षण  संस्थेच्या वतीने रू १४ लाखांचा अधिकचा निधी देवुन क्रीडा संकुलाचे काम पुर्ण केले. 
          आजही श्री शंकरराव  कोल्हे तेथील उपक्रमांची नियमीत माहिती घेवुन तेथिल समस्यांचे निराकरण करतात. विद्यमान आमदार अनेकदा उपसंकुल उभारण्याची भाषा  करतात. खरे तर आपल्या तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद  गटामध्ये उपसंकुल निर्माण झाले तरी हरकत नाही, आपल्या सर्व  खेळाडूंना पुढे जाण्यास मदतच होईल. मात्र येणारा निधी इतरत्र उपसंकुलाच्या नावाखाली पळविण्यापेक्षा त्यातुन सध्याच्या तालुका क्रीडा संकुलात प्रेक्षकांसाठी अद्ययावत आसन व्यवस्था व आधुनिक क्रीडा साधने उपलब्ध करून देणे संयुक्तीक व उपयुक्त ठरेल. त्यासाठी आमच्या स्थरावर क्रीडा प्रेमींना बरोबर घेवुन आम्ही षासन दरबारी पाठपुरावा करीतच आहोत. आपल्या तालुक्यातील सर्वच खेळाडू व त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आम्ही निश्चितच  सर्व क्रीडा प्रेमींसोबत आहोत. त्यामुळे इतर कोणी जिव्हाळा दाखविण्याच्या नावाखाली क्रीडा क्षेत्रात राजकारण आणु नये. 
          सध्या कोपरगांव शहर व परीसरातील शेकडो खेळाडू रोज सकाळी व संध्याकाळी तालुका क्रीडा संकुलात येवुन खेळाचा व व्यायामाचा आनंद घेत असतात. ज्यांना याबाबत शंका  असेल त्यांनी सकाळी लवकर झोपेतुन उठून क्रीडा संकुलात आल्यास त्यांच्या क्रीडा संकुल गैरसोयीचे असल्याच्या शंकेचे  निरसन होईल, तरी इतरही काही शंका  असल्यास आपण सांगाल त्या व्यासपीठावर कागदपत्रांच्या पुराव्यांसहित शंकांचे  निरसन करण्यास आम्ही समर्थ आहोत, असे श्री कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.  


Write
Reply
Forward

Post a Comment

0 Comments