“महसूल विजय सप्तपदी” अभियानातून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील. आमदार आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी :- जिल्ह्यातील नागरिकांच्या महसूल विभागाच्या संदर्भातील अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबविण्यात येते असलेल्या “महसूल विजय सप्तपदी” अभियानाचा प्रभावीपणे वापर गावोगावी शिबीर घेतल्यास या अभिनव अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाचे अनेक नागरिकांचे व गावागावातील सार्वजनिक अडचणींचे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या “महसूल विजय सप्तपदी” अभियानाच्या बैठकीत ते बोलत होते. पुढे बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, “महसूल विजय सप्तपदी” अभियानातून शेती शिवारातील अडलेले रस्ते सुरु करण्यात येणार आहेत. मामलेदार न्यायालयाअंतर्गत असलेली प्रकरणे निकाली काढणे, तुकडेजोड-तुकडेबंदी अधिनियमानुसार अधिमूल्य रक्कम आकारून नियमितीकरणाची मोहीम राबवणे,गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी बांधणे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करणे, प्रलंबित खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप करणे आदी महत्वपूर्ण कामे महसूल विभागामार्फत केली जाणार आहेत. कोपरगाव तालुक्यात देखील महसूल विभागाशी निगडीत अशा प्रकारचे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून “महसूल विजय सप्तपदी” अभियानाच्या माध्यामतून ते प्रश्न सुटण्यासाठी चालना मिळणार आहे. त्यासाठी या नागरिकांनी सहकार्य करून “महसूल विजय सप्तपदी” अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून सामील आपले प्रश्न सोडवून घ्यावेत असे आवाहन केले आहे.
याप्रसंगी यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक पद्माकांत कुदळे,सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, बाळासाहेब बारहाते,अशोकराव काळे, विठ्ठलराव आसने, कारभारी आगवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, पंचायत समिती सदस्य अनिल कदम,मधुकर टेके, श्रावण आसने, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजी महेमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, डॉ. तुषार गलांडे, युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे, रोहिदास होन, राहुल जगधने, चंद्रशेखर म्हस्के, वाल्मिक लहिरे, सागर लकारे, अशोक लांडगे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, भूमी अभिलेख अधीक्षक संजय भास्कर, गटविस्तार अधिकारी डी.ओ. रानमाळ, नायब तहसीलदार श्रीमती मनीषा कुलकर्णी, श्रीमती एम. एस.गोरे, अव्वल कारकून आर.एफ. चौरे, श्रीमती एस.पी.शिंदे, श्री. शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते
0 Comments