मंगेश पाटील यांच्या सत्कारामुळे भारावून गेलो.
----- चेतन वैद्य.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :----- कोपरगावचे भूमीपुत्र संपुर्ण विश्वाला कोरोना लसीकरणात महत्त्वाचे योगदान ठरलेले सिरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी अधिकारी (Executive Officer)श्री.चेतनजी वैद्य हे कोपरगाव येथे बुधवार २फेब्रुवारी आले असता केवळ सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा सन्मान माजी नगराध्यक्ष श्री.मंगेश पाटील यांनी केला. आख्खा विश्वाला कोरोनो महामारी मुळे होत्याचे नव्हते केले.या संकटाने आनेकांना उध्वस्त केले हे नाकारता येणार नाही. मात्र या भयानक महामारीतुनही सिरम कंपनीने लस तयार करून सर्वांनाच दिलासादायक अशी लसीचे संशोधन करुन महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिरम कंपनीचे कार्यकारी अधिकारी चेतन वैद्य हे कोपरगाव चे पुत्र आहे ही अतिशय मोठी अभिमानास्पद बाब आहे. त्याची दखल घेत समाजातील विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान नेहमीच मंगेश पाटील हे करतात हे महत्त्वाचे आहे.हे करत असतांना कुठलाही हेतु न ठेवता केवळ चागंल्या काम करणाऱ्यांच्या प्रति असलेला स्नेह, प्रेम, आपुलकी हेच महत्त्वाचे आहे हेच नगराध्यक्ष मंगेश पाटील हे दाखवून देता असाच सत्कार चेतन वैद्य यांचा करण्यात आला. यावेळी बोलताना चेतन वैद्य म्हणाले की, लसीच्या निमिर्ती नंतर अनेक ठिकाणी आमचे सत्कार करण्यात आले मात्र कोपरगाव येथ मंगेश दादा यांनी केलेला सत्काराने भारावूून गेेलो आहे हा सत्कार विशेष आहे कारण हा माझ्या कुटुंबानेच केलेल्या सत्कारामुळे मला मोठी उर्जा मिळाली आहे. अशी भावना चेतन यावेळी बोलताना व्यक्त केली. यावेळी शिक्षण समितीचे सदस्य व शेतीतज्ञ श्री.मकरंदजी जोशी, वृक्षप्रेमी श्री.बंडूनाना चिंचपुरे,कोविड योध्दा व स्वच्छतादूत श्री.सुशांतजी घोडके, सामाजिक कार्यकर्ते श्री.आनंदराव टिळेकर, श्री. विनोदजी पवार हे उपस्थित होते.
0 Comments