आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

लुटमार करण्यासाठी लुटारुंच्या रडारवर शिर्डी शहरातील रिक्षाचालक.

 लुटमार करण्यासाठी लुटारुंच्या रडारवर शिर्डी शहरातील रिक्षाचालक.

 



शिर्डी प्रतिनिधी:----- लुटमार करून मारहाण करून  मोबाईल व रिक्षा चे पार्ट चोरी करणाऱ्या टोळीच्या रडारवर शिर्डी शहरात रिक्षा चालक असुन पेशंट दवाखान्यात उपचारासाठी आणायचे असे सांगत सुनसान  रस्त्यावर नेऊन लुटमारीच्या दोन तीन घटना कनकुरी पाटाजवळ   घडल्याने  संशयास्पद भांडे ठरवताना काळजी घेण्याचे आवाहन   रिक्षाचालक  रमेश नामदेव पानसरे यांनी केले आहे

अधिक माहिती देताना  १८फेब्रुवारी रोजी तीस च्या वयोगटातील दोन तरुण  शिर्डी बसस्थानकावर आले होते  मला त्यांनी  कनकुरी ला जायचे आहे असे सांगितले  भाडे ठरवुन सुनसान रस्त्यावर घेऊन गेले 

अंदाज पाहुन रोख रक्कम मोबाईल व पैसे लुटण्यासाठीअंचानक हल्ला केला जीव वाचवण्यासाठी पळाल्या मुळे या दोघांनी रिक्षाची चार हजाराची बॅटरी मोबाईल घेऊन पोबारा केला आहे  हे गुन्हेगार आपल्या सहकाऱ्यांना फोन करुन रिक्षा किंवा कोणते वाहन घेऊन येत आहे याची देखील माहिती देतात त्या बरोबरच या दोन तरुणांनी गांजा पिल्यानंतर लुटमार केली हि आपबिती पत्रकाराजवळ व्यक्त केली   लुटमारीच्या या नव्या गुन्हेगारी च्या मोडस मुळे शिर्डी शहरात जवळपास हजार पंधराशे रिक्षा चालकांना चांगलाच धसका घेतला आहे अगोदरच कमी असणारी गर्दी बाजार पेठेतील मंदी यामुळे कुटुंब चालवणे अवघड झाले असताना होत असलेल्या घटना चिंताजनक असुन हे तरुण कानटोपी घालून चेहरा ओळखु नये याची देखील खबरदारी घेतात हे देखील पुढे आले असून अशा तरुणांना गजाआड करण्याचे आवाहन शिर्डी पोलिसांन पुढे उभे राहिले आहे  भयभीट झाल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी  शिर्डी पोलिसांन कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे असे सांगितले

Post a Comment

0 Comments